scorecardresearch

Premium

Mobile Ticketing App : प्रवाशांची मोबाइल तिकीट ॲपला पसंती

तिकीट खिडकी समोरील रांगेत उभे राहून तिकीट वा पास काढणारे प्रवासी आता हळूहळू कागदविरहित मोबाइल ॲप तिकीट सेवेला पंसती देऊ लागले आहेत.

passengers prefer mobile ticketing app
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : करोनाकाळात बंद झालेली रेल्वेची मोबाइल तिकीट ॲप सेवा पुन्हा सेवेत दाखल झाल्यानंतर त्याला प्रवाशांकडून प्रतिसाद वाढू लागला आहे. तिकीट खिडकी समोरील रांगेत उभे राहून तिकीट वा पास काढणारे प्रवासी आता हळूहळू कागदविरहित मोबाइल ॲप तिकीट सेवेला पंसती देऊ लागले आहेत. मार्च २०२२ च्या तुलनेत सप्टेंबरमध्ये मोबाइल ॲपद्वारे प्रतिदिन ७४ हजार तिकीटे काढण्यात आली असून मार्चमध्ये ॲपद्वारे ३६ हजार तिकीटे काढण्यात आली होती.

हेही वाचा >>> मतभेद आणि शाब्दिक बाचाबाचीच्या चर्चांवर प्रताप सरनाईकांसमोरच एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “आम्ही दोघेही…”

Ticket Checking Staff Caught 2693 Travellers Caught Without Tickets At Andheri Railway Station Mumbai Print News video viral
VIDEO: बापरे! अंधेरी स्टेशनवर टीसींची फौज; २४ तासात विनातिकीट प्रवाशांकडून ७ लाख रुपये दंड वसूल
ULHASNAGAR railway station incident of two trains facing each other on the same platform video goes viral
VIDEO: बापरे! एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोरासमोर आल्या; नागरिकांची उडाली तारांबळ, रुळावर उतरुन पळाले
a man got train accident
VIDEO : दहा मिनिटे घरी उशीरा जा पण असा प्रवास करू नका! धावत्या रेल्वेनी फरपटत नेले, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
Passengers traveling by boat in which the sailor leaves the moving boat and climbs the bridge
Video : चालती बोट सोडून खलाशी चढला पुलावर… दाखवला असा स्टंट; प्रवासी झाले थक्क

करोना संसर्ग वाढल्याने मार्च २०२० पासून लोकल प्रवासावर निर्बंध घालण्यात आले होते. टाळेबंदी काळात अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी  देण्यात आली होती. निर्बंध असल्यामुळे अन्य प्रवासी लोकलमधून प्रवास करू नये यासाठी मोबाइल तिकिट ॲप सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली होती. पहिली लाट ओसरल्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च २०२१ मध्ये ॲप सेवा सुरू करण्यात आली. दुसऱ्या लाटेमुळे ॲप सुविधा एप्रिल २०२१ ते २३ नोव्हेंबर २०२१ या काळात बंद ठेवण्यात आली होती. ही लाट ओसरताच मोबाइल तिकीट ॲप पुन्हा कार्यरत झाले. त्यानंतर या सेवेला प्रतिसाद वाढू लागला असून तिकीट खिडकीवरील रांगेत उभे राहण्यापेक्षा मोबाइल ॲपवर तिकीट काढणे प्रवासी पसंत करीत आहेत.

या ॲपद्वारे सप्टेंबर २०२२ मध्ये दररोज ७४ हजार तिकीट काढण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या मार्चमध्ये ३६ हजार तिकीटांची ॲपद्वारे विक्री झाली होती. ॲपद्वारे तिकीटे काढून मार्चमध्ये दररोज दोन लाख १७ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. मात्र सप्टेंबरमध्ये यात दुपटीने वाढ झाली असून ती चार लाख २३ हजार इतकी आहे. मोबाइल ॲपवरून होणाऱ्या तिकीट खरेदीत सुमारे ४.८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोबाइल ॲपवरून ८ टक्के तिकीटे काढली जात आहेत. ठाणे, कल्याण, दादर, कुर्ला, वडाळा, वाशी स्थानकातून मोबाइल ॲपवरवरून मोठ्या प्रमाणात तिकीट व पास काढण्यात येत आहेत.

मध्य रेल्वे उपनगरीय मार्गांवर  तिकीट काढण्याचे प्रमाण

तिकीट खिडकी – ६० ते ६५ टक्के

एटीव्हीएम – २० ते २१ टक्के

जनसाधारण तिकीट बुकिंग सेवा (जेटीबीएस)- ८ ते ९ टक्के मोबाईल ॲप- ८ टक्के

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uts ticket booking app receives good response from passengers mumbai print news zws

First published on: 30-09-2022 at 15:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×