महापालिकेमार्फत प्रकरणाची चौकशी

मुंबई: सेव्हन हिल्स रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील वलयांकित व्यक्तींना नियम मोडून लस दिल्या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे पालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सांगितले. तसेच परवानगी नसताना सुरू असलेले या वयोगटातील लसीकरण बंद करण्याचे आदेशही पालिका देणार आहे.

लशींचा साठा पुरेसा नसल्याने राज्यभरात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण राज्य सरकारने स्थगित केले. मात्र सेव्हन हिल्समध्ये या वयोगटातील वलयांकित व्यक्तींसह खास पाहुण्यांचे लसीकरण सर्रास केले जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने बुधवारी प्रसिद्ध के ले.

‘या प्रकरणी सध्या तरी काही माहिती नाही; परंतु चौकशी के ली जाईल,’ असे पालिके चे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सांगितले आहे. संबंधितांवर कारवाई होणार का, यावर उत्तर देताना पालिके चे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, ‘या प्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांच्याकडे सविस्तर चौकशी केली जाईल. या व्यक्ती कोण पाठवत आहे की रुग्णालय स्तरावर हे घडत याची माहिती घेतली जाईल. तसेच पुन्हा असे लसीकरण करू नये असे आदेश दिले जातील. एका व्यक्तीचे केले की दुसरी येते, मग तिसरी येते असे सत्र चालूच राहते. मागेही रुग्णालयाला असे लसीकरण करू नये, अशा सूचना दिलेल्या होत्या. माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई के ली जाईल.’

डोळेझाक… सेव्हन हिल्स रुग्णालयात लसीकरणासाठी ‘खास पाहुणे’ वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांकडून पाठविले जात असल्याचे समजते. त्यांच्या आदेशावरूनच यांचे लसीकरण सुरू असल्यामुळे पालिकेकडून आत्तापर्यंत या गैरकारभाराकडे डोळेझाक केली जात होती; परंतु आता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तरी पालिका आयुक्त यावर काही कठोर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.