scorecardresearch

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

काँग्रेस नेतृत्वाच्या बदनामीचा निषेध

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड
(संग्रहित छायाचित्र)

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची एका जाहिरातीच्या माध्यमातून बदनामी केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी येथील स्टोरिया फूड्स कंपनीच्या कार्यालयात घुसून तेथील सामानांची तोडफोड केली. त्यानंतर या संदर्भात काँग्रेसच्या वतीने आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, कं पनीच्या संचालकांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अंधेरी पूर्व येथील स्टोरिया कंपनीच्या कार्यालयात सकाळी मुंबई काँग्रेस व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घुसून घोषणाबाजी करीत तेथील काही सामानांची तोडफोड केली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी के लेल्या या तोडफोडीचे समर्थन केले आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांची बदनामी केल्याबद्दल कंपनींने जाहीर माफी मागावी, अन्यथा कंपनी कार्यालय बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी स्टोरिया फूड्सच्या कार्यालयाची तोडफोड केली. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती देताना भाई जगताप यांनी सांगितले की, आमचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल जाहिरातीत आक्षेपार्ह दाखविण्यात आले ते आम्ही कदापी सहन करणार नाही. त्यांना आम्ही धडा शिकवलेला आहे. ही जाहिरात ताबडतोब बंद झाली पाहिजे आणि कंपनीने जाहीररीत्या माफी मागावी, अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन मुंबई काँग्रेस करेल, असा इशारा जगताप यांनी दिला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या