स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू’ असं नाव देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तसेच, विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ देण्यात येणार आहे, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, तर वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल)ला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केली होती.

हेही वाचा : “हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

त्यानुसार १४ मे रोजी संभाजी महाराज जयंतीनिमित्त कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर रविवारी ( २८ मे ) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू’ असं नाव देण्यात आल्याची घोषणा एकनाथ शिंदेंनी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात अनेक कार्यक्रम सुरु आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि समुद्र यांचं नातं आहे. ते लक्षात घेऊन वांद्रे-वर्सोवा या समुद्र सेतुला ‘स्वातंत्र्यीवर सावरकर समुद्र सेतू’ अशा प्रकारचं नाव देण्याची निर्णय घेतला आहे.”

हेही वाचा : पुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”

“तसेच, विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत, शौर्य दाखवणारे आणि संकटातून अनेकांची मुक्तता करणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वीरता’ पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vandre varsova sea link swatantraveer savarkar setu announce cm eknath shinde ssa
First published on: 28-05-2023 at 21:52 IST