वसईच्या भुईगाव समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस आणि तटरक्षक दलामार्फत बोटीची पाहणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिवसभर ही बोट कुणाची आहे आणि का इथे आली? याची माहिती मिळाली नसल्याने सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क कऱण्यात आले आहे.

वसईजवळील भुईगाव समुद्रकिनार्‍यावर गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक संशयास्पद बोट स्थानिकांना दिसली. या भागात बोटींचा वावर नसल्याने ही अनोळखी बोट कशी आली? याचा स्थानिक मच्छिमारांना संशय आला. ही बोट समुद्र किनार्‍यापासून दोन नॉटीकल मैल आतमध्ये आहे. बोटीवर कसलाच झेंडा किंवा निशाण नसल्याने संशयाला बळकटी मिळाली. याबाबत वसई पोलिसांना माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी सुरू केली. पोलिसांनी ड्रोन कॅमेर्‍याच्या मदतीने बोटीवरील तपासणी करण्याचा प्रयत्न केला मात्र बोटीत कुणी आढळून आले नाही. त्यामुळे तटरक्षक दल आणि महाराष्ट्र सागरी किनारा मंडळाच्या (महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड) ची मदत घेण्यात आली आहे. ही बोट संशयास्पद असून आम्ही ड्रोनच्या मदतीने हवाई पाहणी केली परंतु अद्याप बोटीबद्दल माहिती मिळाली नसल्याचे परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी सांगितले.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही सर्व यंत्रणांचा सतर्क केले आहे. अंधार झाल्याने बोटीची पाहणी करण्याचे काम शुक्रवारी सकाळी केले जाईल, असे बंदर निरीक्षक बी.जी. राठोड यांनी सांगितले. दरम्यान, बोटीबाबत संदिग्धता असल्याने खबरदारी म्हणून सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क कऱण्यात आले आहे.