मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकतेच ‘झी टॉकीज कॉमेडी पुरस्कार २०२२’च्या मंचावर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार प्रदान करताना संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेले होते.चित्रपटसृष्टीतील कलाकारांपासून राजकीय नेत्यांपर्यंत अशोक सराफ यांच्या अभिनयाचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. अशोक सराफ यांच्या वयाची पंच्याहत्तरी आणि अभिनय कारकीर्दीची पन्नाशी या दुग्धशर्करा योगाचे औचित्य साधत यंदाचा झी टॉकीज कॉमेडी पुरस्कार सोहळ्यात हा क्षण खास थाटामाटात साजरा करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>बनावट छायाचित्र तयार करून खंडणीची मागणी; खार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

विनोदाच्या टायमिंगचा बादशाह
अशोक सराफ यांच्याकडे अभिनयाची ताकद आणि विनोदाच्या टायमिंगची किल्लीच होती. ‘पांडू हवालदार’, ‘धूमधडाका’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘गंमत जम्मत’, ‘वजीर’, ‘चौकट राजा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये कधी विनोदी, तर कधी गंभीर अशा भूमिका त्यांनी उत्तम वठवल्या.

हेही वाचा >>>बेस्टच्या नोटीसवर कंत्राटदाराचे मौन; मिनी बसची संख्या रोडावली

अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील एक पर्व गाजवले आहे. सहजसुंदर अभिनय आणि विनोदाची नस अचूक माहीत असलेले अशोक सराफ म्हणजे विनोदी अभिनयाचे विद्यापीठ आहे. त्यांच्या संवादशैलीने गेली ५० वर्षे प्रेक्षकांच्या मनावर गारूड केले आहे. झी टॉकीज कॉमेडी पुरस्कार सोहळ्यात विनोदी चित्रपट आणि नाटक या क्षेत्रातील उत्कृष्ट कलाकृतींचा गौरव होत असताना अशोक सराफ यांचा सन्मान होणे म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणीच.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actor ashok saraf honored by zee talkies mumbai print news amy
First published on: 07-10-2022 at 17:35 IST