मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी हिंदू-मुस्लीम संबंध आणि भारतीय स्वातंत्र्यासंदर्भात के लेली विधाने अपरिपक्व आणि बेजबाबदार आहेत. त्यांच्या या विधानांमुळे महाराष्ट्रातील कलाकार खूप व्यथित झाले आहेत, अशी भूमिका घेत कलावर्तुळातील काही मान्यवरांनी आपली नाराजी व्यक्त के ली आहे. पुण्यात झालेल्या जाहीर समारंभात विक्रम गोखलेंसारख्या ज्येष्ठ नटाने के लेली विधाने आश्चर्यजनक आहेत, त्यांच्यासारख्या कलाकाराने समाजविघातक वक्तव्ये वा कृती करू नये, अशी अपेक्षाही या कलावंतांनी व्यक्त के ली आहे.

अभिनेत्री कंगना राणावतने भारताला १९४७ साली स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली, अशा आशयाचे विधान के ले होते. कंगनाच्या या विधानावरून देशभर वादंग माजला असताना विक्रम गोखले यांनीही पुण्यात झालेल्या समारंभात कंगनाच्या वक्तव्याशी मी सहमत आहे, असे सांगत तिला समर्थन दिले. ‘हे स्वातंत्र्य दिलेले आहे. योद्धय़ांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना फाशी दिले जाताना त्या वेळचे मोठे नेते बघत राहिले. त्यांनी या योद्धय़ांना वाचवले नाही,’ असा आरोप गोखले यांनी के ला. विक्रम गोखलेंसारख्या नटाकडून अशा प्रकारची बेजबाबदार विधाने अपेक्षित नसल्याची भावना कलाक्षेत्रातून व्यक्त होते आहे. गोखले यांच्यासारख्या कलाकारांनी समाजाच्या एकतेवर परिणाम करतील अशी वक्तव्ये करू नयेत. ज्या गोष्टीवरून समाजात दुही पसरली आहे, दंगली होत आहेत, अशा परिस्थितीत त्यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी कलाकारांकडून अशा प्रकारची अपरिपक्व विधाने करणे योग्य नाही, अशी भूमिका घेत आम्ही पत्राद्वारे निषेध व्यक्त के ला आहे, अशी माहिती रंगकर्मी अरुण नाईक यांनी दिली. गोखले यांनी कंगना राणावतच्या बेताल वक्तव्यांना दिलेला दुजोरा आणि भारतीय स्वातंत्र्याबद्दल काढलेले उद्गार यामुळे कलाक्षेत्र व्यथित झाले आहे, असेही  पत्रात म्हटले आहे. या पत्राला सुप्रसिद्ध चित्रकार, लेखक सुभाष अवचट, नाटय़दिग्दर्शक प्रेमानंद गज्वी, अमरेंद्र धनेश्वर, ज्येष्ठ रंगकर्मीकमलाकर सोनटक्के , रामदास भटकळ, दिग्दर्शिक प्रतिमा कु लकर्णी, अच्युत वझे अशा मान्यवरांनी समर्थन दिले आहे, असेही नाईक यांनी सांगितले.