सुप्रसिद्ध अभिनेत्रीची व्यावसायिकाविरोधात बलात्काराची तक्रार; आरोपी अटकेत

पीडिता या ७० आणि ८० च्या दशकातील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत.

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्रीने मुंबईतील एका व्यावसायिकाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. जुहू पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. ६८ वर्षीय अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे. आरोपीला आज न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.

पीडित अभिनेत्रीने आरोपी व्यावसायिकाविरोधात पाठलाग करून धमकावल्याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वीही तक्रार दाखल केली होती. आता मात्र त्यांनी बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. आरोपी बऱ्याच दिवसांपासून पीडितेचा पाठलाग करत होता. तसंच त्यांना व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेजही पाठवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याचप्रमाणे आरोपीने सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. पीडिता या ७० आणि ८० च्या दशकातील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Veteran bollywood actress has registered a rape case against a businessman in mumbai