मुंबई : मराठी संगीत रंगभूमीवर स्वतःची विशेष छाप पाडणारे ज्येष्ठ गायक – अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

पिळगावकर यांनी विल्सन महाविद्यालयातून ‘बी.ए.’ अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात ‘लिपिक’ म्हणून नोकरी केली. या दरम्यान राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) मीना पेठे निर्मित ‘संगीत वासवदत्ता’ या नाटकात उदयन ही भूमिका साकारण्याची त्यांना संधी मिळाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने संगीत रंगभूमीवर काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातील नोकरीचा राजीनामा देत त्यांनी पूर्णवेळ गायन व अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला. पिळगांवकर यांनी पंडित के. डी. जावकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित गोविंदराव अग्नी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले, तर डॉ. दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांकडून नाट्यशास्त्राचे धडे घेतले. तसेच त्यांनी ‘साहित्य संघ’ आणि ‘विद्याधर गोखले प्रतिष्ठान’ या संस्थांमध्ये संगीत नाट्यप्रशिक्षक म्हणूनही काम केले होते.

Ganpat Gaikwad wrote letter to Kalyan Dombivli Municipal Commissioner with jail approval
गणपत गायकवाड यांचे तुरुंगातून विकास कामांसाठी कडोंमपा आयुक्तांना पत्र
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
star pravah tharla tar mag and lagnanantar hoilach prem sangeet ceremony
तब्बल ३३ कलाकार, सलग ३ दिवस शूट अन्…; ‘स्टार प्रवाह’च्या २ मालिकांचा महासंगीत सोहळा ‘असा’ पडला पार, दिग्दर्शक म्हणाले…
Film Acting Demar and Devar Hindi Cinema
चित्रपट: देमार आणि देव्हारपटांची पन्नाशी…
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
zee marathi tv serial mahasangam meghan jadhav reveal efforts behind shoot
२५० क्रू मेंबर्स, ६० कलाकार अन्…; २ मालिकांच्या ‘महासंगम’साठी केली ‘अशी’ तयारी! पुण्यात ‘या’ ठिकाणी पार पडलं शूटिंग
good feelings song Cold Play show ahmedabad Satyajit Padhye puppet show
‘कोल्ड प्ले’च्या मंचावर सत्यजित पाध्ये आणि सहकारी, ‘गुड फिलिंग्स’ गाण्यावर बोलक्या बाहुल्यांचे लक्षवेधी सादरीकरण
Marotrao Gadkari passed away, Senior Gandhian thinker, Marotrao Gadkari , Marotrao Gadkari news,
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत मा. म. गडकरी यांचे निधन, विनोबाजींच्या भूदानयज्ञात त्यांनी…

हेही वाचा – मुंबईतील वित्तीय, गुंतवणूक संस्थांची माहिती गोळा करा; मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे आदेश

मुंबई मराठी साहित्य संघाने सादर केलेल्या ‘यशवंतराव होळकर’ या ऐतिहासिक नाटकाच्या माध्यमातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले आणि त्यानंतर ‘ललितकलादर्श’, ‘कलावैभव’, ‘नाटयमंदार’, ‘रंगशारदा’ आणि ‘चंद्रलेखा’ आदी नाट्यसंस्थांच्या अनेक नाटकांमधून विविध भूमिका त्यांनी साकारल्या. तसेच आकाशवाणी – दूरदर्शनसाठीही काम केले.‘संगीत मानापमान’ या नाटकात वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी ‘धैर्यधर’ ही भूमिका साकारण्यासह ‘लक्ष्मीधर’ ही भूमिकाही साकारली होती. पिळगावकर यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कारा’सह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

हेही वाचा – नोंदणीकृत नसलेल्या डॉक्टरांवर नववर्षात कारवाई, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा निर्णय

विविध पौराणिक आणि संगीत नाटकांमधून काम

अरविंद पिळगावकर यांनी विविध पौराणिक आणि संगीत नाटकांमधून काम केले. त्यांनी ‘नयन तुझे जादुगार’, ‘घन:श्याम नयनी आला’, ‘जय जगदीश हरे’, ‘धाडिला राम तिने का वनी’ तसेच ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत मृच्छकटिक’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत शारदा’, ‘संगीत मानापमान’, ‘संगीत भावबंधन’, ‘संगीत स्वयंवर’, ‘संगीत पुण्यप्रभाव’, ‘संगीत एकच प्याला’ आदी संगीत नाटकांमधून काम करीत स्वतःची विशेष ओळख निर्माण केली. तसेच ‘संत कान्होपात्रा’, ‘संत नामदेव’, ‘भाव तोची देव’ आणि ‘आतून कीर्तन वरून तमाशा’, ‘विठो रखुमाय’, ‘दशावतारी राजा’ या लोकनाट्यांमधून तसेच काही वगनाट्यांतही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

Story img Loader