लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : ज्येष्ठ नाट्य लेखक आणि दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. आज सायंकाळी त्यांच्या ‘मु. पो. वडाचे म्हसवे ते यु.एस.ए’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात येणार होते. त्यांच्या पार्थिवावर डोंबिवली येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू
Child dies in husband-wife fight Crime of culpable homicide against man
पतीने रागाच्‍या भरात पत्‍नीला मारली लाथ, कडेवरील चिमुकलीचा खाली पडून…
First Miss World Kiki Hakansson Death
First Miss World : जगातली पहिली ‘विश्वसुंदरी’ काळाच्या पडद्याआड! किकी हॅकन्सन यांचं ९५ व्या वर्षी निधन

सातारा जिल्ह्यातील म्हसवे या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी. कॉम आणि एम.ए ची पदवी प्राप्त केली होती. १९७९ ते २००० सालापर्यंत म्हसवेकर हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ लेखनासाठी झोकून दिले. त्या दरम्यान, त्यांनी ‘यू टर्न’, ‘कथा’, ‘जोडी जमली तुझी माझी’, ‘ केंव्हा तरी पहाटे’ यांसारख्या ३८ नाटकांचे लिखाण केले. तर, ‘असा मी काय गुन्हा केला’, ‘भरत आला परत’, ‘दुर्गा म्हणत्यात मला’, ‘जन्म’, ‘आम्ही बोलतो मराठी’, ‘साद’, ‘तृषार्त’, ‘झेंटलमन’ आदी चित्रपटांचेही लेखन केले. त्याचबरोबर, ‘या गोजिरवाण्या घरात’ आणि ‘चार दिवस सासूचे’ या मालिकांचे लेखनही त्यांनी काही काळ केले होते. लेखनाबरोबरच म्हसवेकर यांनी ‘असा मी काय गुन्हा केला’ आणि ‘आम्ही बोलतो मराठी’ या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते.

आणखी वाचा-Raj Thackeray : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “बाहेरच्या राज्यातून…”

म्हसवेकर यांच्या यू टर्न या नाटकासाठी त्यांना ‘झी नाट्य गौरव सर्वोत्कृष्ट लेखकाचा’ २००९ साली पुरस्कार देण्यात आला होता. तसेच, ‘महाराष्ट्र राज्य शासन अभ्यासक नाट्य महोत्सवात सर्वोत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक’, ‘मुंबई मराठी साहित्य संघाचा उत्कृष्ट लेखक’, ‘चतुरंग सवाई लेखक’, ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक’ आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.