साहित्य महोत्सव १८ ते २१ नोव्हेंबरदरम्यान

मुंबई : ज्येष्ठ लेखिका अनिता देसाई यांना ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’तर्फे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ कवी आदिल जस्सावाला यांना ‘पोएट लॉरिएट पुरस्कारा’ने सन्मानित केले जाणार आहे.  साहित्य महोत्सव १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाइन होईल. 

Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

अनिता देसाई यांची पहिली कादंबरी ‘क्राय द पीकॉक’ ही १९६३ साली प्रकाशित झाली होती. त्यांनी ‘रायटर्स वर्कशॉप’  ही प्रकाशन संस्थाही सुरू केली.  त्यांच्या १९८४ साली प्रकाशित झालेल्या ‘इन कस्टडी’ या कादंबरीला बुकर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. ‘मॅसॅच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थे’त त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केले. १९९९ साली बुकर नामांकनांच्या अंतिम यादीत स्थान मिळवलेल्या ‘फास्टींग फीस्टींग’ या कादंबरीमुळे अनिता देसाई यांची लोकप्रियता वाढली. आदिल जस्सावाला यांचे ‘लॅण्ड्स एण्ड’ आणि ‘मिसिंग पर्सन’ हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. 

मुंबईचा साहित्य महोत्सव अशी ओळख असणारा ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’ हा कार्यक्रम गुरूवारपासून सुरू होत आहे. यात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय असे १४०पेक्षाही अधिक वक्ते सहभागी होणार आहेत. चर्चासत्रे, कार्यशाळा, सादरीकरणे, व्याख्याने, इत्यादींचा या महोत्सवात समावेश आहे. 

अखेरच्या दिवशी हेमंत दिवटे, कल्पना दुधाळ, मन्या जोशी, प्रज्ञा दया पवार, प्रफुल्ल शिलेदार हे मराठी कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. या महोत्सवासंबंधी अधिक माहिती  https://tatalitlive.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.