scorecardresearch

Premium

Video : शेवटपर्यंत ही खंत राहिल; ‘ट्रॅजिडी किंग’च्या आठवणींनी नानांचा कंठ आला दाटून

Nana patekar Tribute To Dilip Kumar : दिलीप कुमार यांच्या आठवणी सांगताना नाना पाटेकर यांचाही कंठ दाटून आला… ट्रॅजेडी किंगबद्दल काय म्हणालेत नाना पाटेकर…; ऐका त्यांच्याच आवाजात…

Nana patekar Tribute To Dilip Kumar, nana patekar share memories about dilip kumar
दिलीप कुमार यांच्या आठवणी सांगताना नाना पाटेकर यांचाही कंठ दाटून आला…

‘ट्रॅजेडी किंग’ अशी बिरुदावली मिरवणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं ७ जुलै रोजी निधन झालं. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक सोनेरी पान गळालं. मोजकेच; पण अजरामर सिनेमातून केलेल्या त्यांच्या अभिनयाचं गारूड चित्रपट रसिकांवर कायमचं कोरलं गेलं. अशा महान कलावंताविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी! दिलीप कुमार यांच्या आठवणी सांगताना नाना पाटेकर यांचाही कंठ दाटून आला… ट्रॅजेडी किंगबद्दल काय म्हणालेत नाना पाटेकर…; ऐका त्यांच्याच आवाजात…

genelia deshmukh gets surrounded with little kids on the street
Video : जिनिलीया त्यांच्याजवळ गेली अन्…; देशमुखांच्या सुनेच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, सर्वत्र होतंय कौतुक
N D Studio
नितीन देसाई यांच्या N.D Studio मध्ये होतंय अक्षरा-अधिपतीच्या लग्नाचं शूटिंग, अनुभव सांगत दोघं म्हणाले, “हा सेट…”
dr Balram Bhargava after seeing nana patekar in the vaccine war
‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये नाना पाटेकर यांना स्वतःच्या भूमिकेत पाहून भावुक झाले डॉ. बलराम भार्गव, म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

पाच दशकांची कारकीर्द…

पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी ‘मुगल-ए-आजम’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘राम और श्याम’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘मुगल-ए-आजम’ मधील सलीमप्रमाणेच ‘देवदास’ चित्रपटातील त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतो. देवदास ही बंगाली लेखक शरतचंद्र यांची कादंबरी. बालमैत्रीण पारोवर प्रेम असूनही तिच्याशी लग्न न करता आलेला आणि त्यानंतर दारूच्या नशेत आकंठ बुडालेला, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पारोचा ध्यास घेतलेला ‘देवदास’ दिलीप कुमार यांनी ज्या तन्मयतेने रंगवला. १९९८ मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video nana patekar tribute to dilip kumar nana patekar share memories about dilip kumar bmh

First published on: 14-07-2021 at 17:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×