मुंबईतील बसचा ‘ब्रेक फेल’ झाल्याने ज्योती हॉटेलकडून संतोष नगरकडे जाताना भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात चारजण जखमी झालेत. यात चालक आणि प्रवाशांचा समावेश आहे. सर्व जखमींवर वेदांत हॉस्पीटल आणि ट्रामा हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे अपघात झाला तेव्हा बसमध्ये प्रवासी होते आणि ज्या वाहनांना बसने धडक दिली त्यातही चालक बसलेला होता. त्यामुळे या घटनेने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला. या प्रकरणी दिंडोशी पोलीस अधिक तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जखमींमध्ये बसचा चालक पुंडलिक धोंगडे, वाहक (कंडक्टर) आबासाहेब कोरे, बसमधील एक प्रवासी आणि एक रिक्षा चालक भुवाळ पांडे अशा चौघांचा समावेश आहे. चौघेही जखमी असले तरी त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. अपघात झाला ती बस कुर्ला बस डेपोची असून तिचा क्र. एमएच ०१ एपी ०४७६ असा आहे. या बसचा मार्ग क्रमांक ३२६ आहे.

नेमकं काय झालं? व्हिडीओ पाहा…

आधी या बसचे ब्रेक फेल झाल्याने बस अनियंत्रितपणे धावत होती. या अनियंत्रित बसने आधी रस्त्यावर चालक बसलेला असतानाच एका रिक्षाला धडक दिली. त्यानंतर रिक्षाला घसरत घेऊन या बसने पुढे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका अॅपे रिक्षालाही धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेलं भाजीपाल्याचं दुकानं उद्ध्वस्त केलं.

हेही वाचा : पुणे-लोणावळादरम्यान लोकलची म्हशीला धडक; एक तास रेल्वेसेवा विस्कळीत

बस वाटेत येणाऱ्या प्रत्येक वाहनाला धडक देत पुढे गेली आणि अखेर ही बस एका पिंपळाच्या झाडाला धडकून थांबली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of bus hit rikshaw ape after break fail in mumbai major accident many injured rno news pbs
First published on: 10-08-2022 at 13:53 IST