Video: बापाचं काळीज… लग्नानंतर मुलीची पाठवणी करताना संजय राऊतांच्या डोळ्यात आलं पाणी

भाषणांमधून विरोधकांवर हल्लाबोल करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांची हळवी बाजू मुलीच्या लग्नामध्ये पहायला मिळाली.

sanjay raut daughter wedding
सोमवारी मुंबईमध्ये हा विवाहसोहळा पार पडला

शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा विवाहसोहळा सोमवारी मुंबईमध्ये पार पडला. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे पूर्वशी यांच्यासोबत आज लग्नबंधनात अडकल्या. अनेक दिग्गजांनी हजेरी लावल्याचं पहायला मिळालं. अगदी पालिका स्तरावरील महत्वाच्या पदावरील व्यक्तींपासून राष्ट्रीय राजकारणात दबदबा असणाऱ्या नेत्यांनी या लग्नाला हजेरी लावली होती. लग्नादरम्यान संजय राऊत हे अनेकांचे अगदी आपुलकीने स्वागत करताना दिसत होते. या लग्नातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत असतानाच राऊत यांची हळवी बाजू दाखवणारा पूर्वशी यांना लग्नानंतर निरोप देतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

पाहा खास फोटो >> मंचावरील गप्पा, सुरक्षा रक्षकांचं कडं अन् सेल्फीसाठी गर्दी…; राऊतांच्या मुलीच्या लग्नात राज ठाकरेंची चर्चा

भारतीय राजकारणामध्ये सध्या आक्रमक वक्तृत्व शैली असणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी असणारे आणि त्यासाठी देशभरामध्ये ओळखले जाणारे राऊत आज मुलीच्या लग्नानंतर पाठवणीच्या वेळेस भावुक झालेले दिसले. लग्न अगदी थाटामाटात आणि दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये झाले असले तरी सर्वसामान्य घरात ज्या प्रमाणे मुलीच्या पाठवणीच्यावेळी वातावरण भावनिक होते तसेच चित्र पूर्वशी यांच्या लग्नानंतर दिसून आलं. मुलीच्या संगीत कार्यक्रमात नाचलेले राऊत मुलीची पाठवणी करताना मात्र भावूक झाले. पाठवणीच्यावेळी राऊत यांचे बापाचे हृदय भरून आले आणि भल्याभल्या राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या या शिवसेना नेत्याची ही हळवी बाजू पहिल्यांच पहायला मिळाली. मुलीली सासरी पाठवताना राऊत यांच्या डोळ्यातून अश्रू तरळल्याचंही पहायला मिळालं.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video sanjay raut daughter wedding shivsena mp says good bye to daughter with moist eyes scsg

Next Story
आफ्रिकेतून आलेल्या १०० प्रवाशांच्या पुन्हा चाचण्या ; ४६६ प्रवासी मुंबईत दाखल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी