चालकांच्या मनमानीला चाप

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जाताना वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन मोठय़ा प्रमाणात केले जाते.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २०३ सीसीटीव्ही कॅमेरे, मदतीसाठी ३६ वाहने

मुंबई: वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि वाढते अपघात यावर नियंत्रणासाठी मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावर सक्षम यंत्रणा नाही. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) अद्ययावत असे २०३ सीसीटीव्ही कॅ मेरे, मदतीसाठी ३६ वाहने व अन्य यंत्रणा बसवण्यात येणार असून त्यासाठीची निविदा प्रक्रि या पूर्ण झाली आहे. निविदा व निधीच्या अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर के ला असून त्याच्या मंजुरीनंतर दहा महिन्यांत अद्ययावत यंत्रणा मुंबई-पुणे द्रुतगतीवर बसविली जाईल.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जाताना वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन मोठय़ा प्रमाणात केले जाते. वाहनचालकांवर कारवाईसाठी म्हणून महामार्ग पोलीस उपलब्ध मनुष्यबळाबरोबरच स्पीडगन, ई-चलान यंत्रणा अशा सुविधा असलेल्या अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर व्हेईकल’ (अद्ययावत वाहन) मार्फतही कारवाई करतात. एका स्वयंसेवी संस्थेतर्फे  या मार्गावर के वळ दोनच सीसीटीव्ही कॅ मेरे बसविले आहेत. त्यामुळे एमएसआरडीसीने ‘महामार्ग वाहतूक व्यवस्थापना’ अंतर्गत २०३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय साधारण सव्वावर्षांपूर्वी घेतला होता. या वाहतूक व्यवस्थापनांतर्गत कारवाईसाठी अद्ययावत अशी वाहने व अन्य यंत्रणेचाही समावेश आहे. या निविदा प्रक्रियेला करोनाकाळात सुरुवात के ली होती. ती काहीशी रखडली. परंतु ती प्रक्रि या पूर्ण करून त्याचे काम एका कं पनीलाही दिले. हे काम सुरू करण्यापूर्वी त्याची अंतिम मंजुरी राज्य सरकारकडून घेणे गरजेचे असते. त्यासाठी प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. प्रकल्पाचा खर्च २०० कोटींहून अधिक असून राज्य सरकारकडून ४० कोटी रुपये निधी मिळणार आहे. ऊर्वरित खर्च कं पनीकडून के ला जाईल.

अडीच वर्षांत २०१ जणांचा मृत्यू

मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावर २०१९ पासून ५५१ अपघात झाले आहेत. यात १७० प्राणांतिक अपघातात २०१ जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय याच मार्गावर २०२० पासून ६ लाख ९९ हजार ४० वाहतूक नियम उल्लंघनाच्या झाल्या आहेत. यामध्ये धोकादायकरीत्या वाहन चालवल्याने १४ हजार ७२ आणि वेगमर्यादेचे उल्लंघन के ल्याप्रकरणी ३ लाख ५१ हजार ५६७ प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात आली.

यंत्रणेचे वैशिष्टय़े

  •  वाहनाचा सरासरी वेग तपासण्यासाठी ३९ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे.
  • टोल नाक्यांवर अद्ययावत अशी वाहनांचे वर्गीकरण करणारी आणि वाहनांचा क्र मांक ओळखणारी स्वयंचलित यंत्रणा.
  •  मार्गिकांचे उल्लंघन तपासणारी यंत्रणा-३४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे.
  • अकरा ठिकाणी हवामानाचा अंदाज घेणारी यंत्रणा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Violation of traffic rules accident control from maharashtra state road development corporation akp

ताज्या बातम्या