धनगरांना अनुसूचित जमातीतून आदिवासी म्हणून आरक्षण देण्यास आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी विरोध केला आहे. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण देण्यास आपली हरकत नाही. ते कसे द्यायचे, याचा निर्णय सरकारने घ्यावा, असे सावरा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य सरकारची पंचाईत झाली आहे.धनगरांना आदिवासी म्हणून आरक्षण देण्याची मागणी आहे. राज्य सरकारने यासंदर्भात अ‍ॅडव्होकेट जनरल यांचे कायदेशीर मतही घेतले आहे. हा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारला असून त्यासाठी राज्य सरकारची शिफारस आवश्यक आहे. पण आदिवासींचा रोष होऊ नये, यासाठी राज्य सरकारने केंद्राला शिफारस करणे टाळले आहे. आता धनगरांना आदिवासी म्हणून आरक्षण देण्यात यावे, यासाठी दबाव वाढत आहे. तर सावरा यांनी त्यास विरोध केला आहे.