गोवंडी स्थानकाबाहेरील ६४ एकर भूखंडाच्या जागेवर आशियातील सर्वात मोठे पशूवधगृह १९७१ साली उभारण्यात आले. गेली अनेक वष्रे या जागेत मेंढय़ा, बकरी, म्हशी आणि २०१५पर्यंत बल यांच्या खरेदी-विक्रीचा बाजार सुरू आहे. हा बाजार सर्वसामान्यांच्या ‘बाजार’ संकल्पनेपेक्षा खूपच वेगळा आहे. ‘खरेदी-विक्री’ हा बाजाराचा स्थायी भाव असला तरी पशूवधगृहातील बाजार हा अनुज्ञाप्तीकरांसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई अगदीच परदेशात जाणारे शेळ्या, मेंढय़ांचे मास या बाजारातूनच निर्यात केले जाते. या देवनार बाजाराची एक सफर..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेलाचा तवंग आलेला मटणखिमा, खुसखुशीत तळलेले मटण कटलेट हे आठवले तरी मांसाहारप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटते. दुकानातून काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेल्या मटणावर संस्कार करून त्यापासून विविध पदार्थ बनविले जातात. हे मटण देवनारमधील पशूवधगृहातील जनावरांच्या बाजारातून येते. विक्रेता, दलाल आणि ‘गवाल’ (प्राण्यांचा सांभाळ करणारी जमात) यांच्यामध्ये हा बाजार चालतो. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश तसेच सातारा, सांगली, जळगांव येथील आठवडी बाजारात विकलेल्या शेळ्या, मेंढय़ा आणि म्हशी देवनारमध्ये आणून विकल्या जातात. दर आठवडय़ाच्या मंगळवारी व शनिवार शेळ्या-मेंढय़ांचा मोठा बाजार भरतो. तर सोमवार व शुक्रवारी येथे म्हशींचा बाजार भरतो. येथे दररोज २०० ते २५० डुकरांना मारण्यात येते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Visit to deonar bakra mandi
First published on: 19-04-2017 at 03:43 IST