मुंबई : Vivaan Sundaram passed away चित्र-शिल्पांच्या पलीकडल्या दृश्यकलेत मांडणशिल्पे, व्हीडिओकला आदी अनेक प्रयोग करणारे आणि सामाजिक भान जपणारे दृश्यकलावंत विवान सुंदरम यांचे बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दिल्लीत निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. विवान हे १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून प्रयोगशील कलाकृतींसाठी ओळखले जात. गेली चार वर्षे ते आजारी होते. त्यामुळे करोना, टाळेबंदी यांविषयीचे त्यांचे भाष्य दृश्यकलेतून दिसू शकले नाही. प्रकृती अधिकच खालावल्याने आठवडाभर ते कृत्रिम श्वसनावर होते. बुधवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज, गुरुवारी दुपारी १२ वाजता दिल्लीच्या लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  देशभरातील अनेक नव्या चित्रकार आणि रसिकांना विवान यांच्या कलाकृतींचे अप्रूप असे. १९६८ मध्ये, युरोपात तरुणाईची चळवळ सुरू असताना विवान ब्रिटनमध्ये शिकत होते. तेथे त्यांची सामाजिक-राजकीय दृष्टी व्यापक झाली. पुढली काही वर्षे त्यांनी कॅनव्हासवर तैलचित्रे केली, पण भारतात नवे काय करता येईल याचाही शोध सुरू केला. कसौली येथे चित्रकारांना एकत्र राहण्या- काम करण्याची सुविधा उभारण्यापासून त्यांचे कलाक्षेत्रातील संघटनकार्यही सुरू झाले. डाव्या पक्षांकडेही विवान आकृष्ट झाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivaan sundaram passed away visual artist visual arts ysh
First published on: 30-03-2023 at 00:02 IST