मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मलबार हिलमधील मतदारांनी पर्यावरण संवर्धन आणि भटक्या प्राण्यांच्या कल्याणासाठी योजना राबविण्याचा आग्रह धरत नागरिकांचा जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे.

मलबार हिल परिसरातील ‘फ्रेंड्स ऑफ मलबार हिल’ या गटाने मतदारसंघातील नागरिकांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मलबार हिल मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने (उद्धव ठाकरे) भैरू चौधरी (जैन) यांना, तर महायुतीने भाजपचे आमदार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, विकासकामे, पुनर्विकास प्रकल्प याव्यतिरिक्त परिसरातील पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन याचबरोबर भटक्या प्राण्यांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या अशी एकमुखी मागणी या जाहीरनाम्यात केली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…

हेही वाचा >>>Mahesh Sawant : “अमित ठाकरे बालिश, तो काहीही…”, महेश सावंतांची टीका; राज ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले…

तसेच उमेदवाराला पर्यावरण संरक्षण आणि उपाययोजनांबाबत चांगली माहिती असावी, मलबार हिलमधील मोकळ्या जागा, वृक्षाच्छादित परिसराचे संवर्धन करण्यासाठी उमेदवाराने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर सर्व खाजगी भूखंडावरील वृक्षगणना करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच पुनर्विकास प्रकल्पांना प्राधान्य देताना या प्रकल्पांमुळे पर्यावरणाची हानी होणार नाही याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे. नागरी पायाभूत सुविधांमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी, योग्य पाणीपुरवठा, एकल वापर प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहन आणि क्लिन-अप मार्शल तैनात करणे यावर भर देण्याची मागणी करण्यात आली आहे. बाणगंगेसह मलबार हिलमधील पुरातन वारसा वास्तूंचे संवर्धन करण्याची मागणी नागरिकांच्या जाहिरनाम्यात करण्यात आली आहे. याचबरोबर भटक्या प्राण्यांच्या कल्याणासाठी ठोस उपाययोजना करावी, असे जाहीरनाम्यात नमूद केले आहे.

दरम्यान, मलबार हिल येथील १३६ वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन जलाशयाच्या पुनर्बांधणीचा वाद गेल्या काही महिन्यांपूर्वी चिघळला होता. या कामासाठी ३८९ झाडे कापावी किंवा पुनर्रोपित करावी लागणार असल्यामुळे या परिसरातील नागरिक, पर्यावरणवाद्यांनी झाडे हटवण्यास विरोध केला होता. तसेच या कामामुळे हॅंगिग गार्डन काही वर्षे बंद ठेवावे लागणार होते. त्यामुळे नागरिकांनी जलाशयाच्या पुनर्बांधणीला विरोध केला आहे.

Story img Loader