Vulgar Dance In Election Campaign : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी रविवारी संपली. त्यानंतर आता प्रचाराच्या रणधुमाळीला जोर येणार यात काही शंकाच नाही. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या निवडणुकीत दिसणार आहे. दरम्यान शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचारात अश्लील नाच केला गेला आहे असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून पोस्ट करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काय म्हटलं आहे?

“हा पहा मिंधे गटाच्या कुर्ला विधानसभा उमेदवारचा तथाकथित जनहित प्रचार! महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंकित करणारे!!! ( Vulgar Dance In Election Campaign ) महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंकित करणारे.” असं म्हणत हा व्हिडीओ @ShivsenaUBTComm या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे.

sada sarvankar marathi news
अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा? सदा सरवणकरांचे माघारीचे संकेत? म्हणाले, “कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय…”
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

या व्हिडीओत काय दिसतं आहे?

जो व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे त्यात एक नर्तिका अत्यंत अश्लील हावभाव करत नाच ( Vulgar Dance In Election Campaign ) करते आहे. ‘कमरिया’ या गाण्यावर ही नर्तिका नाचताना दिसते आहे. तसंच तिचे कपडेही तोकडे असल्याचं दिसून येतं ( Vulgar Dance In Election Campaign ) आहे. जो नाच ( Vulgar Dance In Election Campaign ) पाहून कुणालाही किळस येईल असंच हे नृत्य आहे. या व्हिडीओत समोर महिला, मुलीही बसलेल्या दिसत आहेत. यामुळेच उद्धव सेनेने हा व्हिडीओ पोस्ट करत एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार

निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडी यांचा प्रचार सुरु झाला आहे. या प्रचाराला रंग चढेल तो ५ आणि ६ नोव्हेंबरपासून. महाराष्ट्रात आता प्रचाराची रणधुमाळी सुरु होईल. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच हे जाहीर केलं होतं की ६ नोव्हेंबरपासून आम्ही प्रचार सुरु करु. महाविकास आघाडी आणि महायुती या दोहोंनी जिंकून येण्याचा दावा केला आहे. मतदान किती टक्के होणार? तसंच मतदार कुणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या सगळ्यात महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचारातला हा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अनेक नेटकऱ्यांनीही या व्हिडीओवर टीका केली आहे.

Story img Loader