|| रमेश पाटील

उत्पादन केवळ पाच ते १० टक्क्यांवर; संकरित वाणांकडे कल

वाडा : ‘वाडा कोलम’ या तांदळामुळे वाडा तालुक्याची ओळख देशभरात असली, तरी इतर भागांतून पिकविल्या आणि विकल्या जाणाऱ्या या तांदळामुळे होणारे नुकसान तसेच तुलनेने अधिक उत्पादनाच्या आशेमुळे येथील शेतकऱ्यांनी भाताचे इतर संकरित वाण घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाडा तालुक्यात वाडा कोलमचे उत्पादन अवघ्या ५ ते १० टक्क्यांवर आले आहे.

Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
Mild earthquake tremors in Akola district
अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे

मुंबई तसेच अन्य मोठ्या बाजारपेठांमध्ये वाडा कोलमच्या नावाने अन्य ठिकाणी उत्पादित होणारा तांदूळ विक्रीस आणला जात असल्याचे येथील शेतऱ्यांच्या निदर्शनास आले. बाजारात या तांदळामुळे वाड्यातील मूळ उत्पादनाची विक्री कमी झाली आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

वाडा कोलमपेक्षा संकरित वाणांची उत्पादन क्षमता अधिक प्रमाणात असल्याने येथील शेतकऱ्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला रोख भाताच्या संकरित पिकांकडे वळविला, असे शेतकरी लक्ष्मण पाटील यांनी सांगितले. हळव्या वाणातील मोहर, दप्तरी, पूनम व निमगरव्या वाणातील जोरदार, रुपाली, पूजा तसेच अतिगरव्या वाणातील सुवर्णा, मसुरी, कर्जत-२ या संकरित भात बियाणांसाठी येथील शेतकरी अधिक आग्रही असल्याचे दिसून येते.

वाडा तालुक्यात भात लागवडीचे एकूण क्षेत्र १८,५०० हेक्टर इतके असून यामध्ये गतवर्षी फक्त तीनशे हेक्टर क्षेत्रावर मूळ ‘वाडा कोलम’ची लागवड केली होती. या वर्षीच्या खरीप हंगामात हे क्षेत्र दोनशे हेक्टरने वाढेल, असे ‘वाडा कोलम बहुउद्देशीय  सहकारी संस्थे’चे उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी सांगितले. ‘वाडा कोलम’चे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची आजही काही कृषी सेवा केंद्रांतून बोगस बियाणे देऊन फसवणूक सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. या वाणाची जोपासना करून ते अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे संस्थेचे अध्यक्ष बी.बी.ठाकरे यांनी सांगितले. संस्थेला अलीकडेच जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हाधिकारी यांनी १० लाख रुपयांचा निधी दिला आहे. दरम्यान, या वाणाला भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी कृषी विभागाचे वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपविभागीय कृषि अधिकारी (वाडा) मिलिंद जाधव यांनी दिली.

भौगोलिक मानांकनाचा आग्रह..

वाडा कोलमचे मूळ वाण टिकून राहिले पाहिजे यासाठी येथे ‘वाडा कोलम बहुउद्देशीय सहकारी संस्था’ निर्माण झाली आहे. ती येथे वाडा कोलमचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.  ‘वाडा कोलम’ या मूळ वाणाला भौगोलिक मानांकन मिळाले तरच बाजारपेठेत त्यास न्याय मिळेल अशी भूमिका या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.

झाले काय? वाडा तालुक्यात उत्पादन होणाऱ्या मूळ वाडा कोलमला इतरत्र उत्पादन होणाऱ्या वाडा कोलमचा किमतीच्या बाबतीत मोठा फटका बसला. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून येथील शेतकऱ्यांनी वाडा कोलमचे उत्पादन घेणे कमी केले. भात लागवडीच्या १८,५०० हेक्टरपैकी येथे केवळ तीनशे हेक्टर क्षेत्रावरच गेल्या वर्षी वाडा कोलमचे उत्पादन झाले.

लोकप्रिय का? १२५ दिवसांच्या झिणी आणि १३० ते १३५ दिवसांच्या सुरती कोलम या दोन जातींना एकत्र करून १९८० च्या सुमारास ‘वाडा कोलम’ची जोपासना करण्यात आली. तांदळापासून तयार होणाऱ्या सुट्या आणि मुलायम भातामुळे जगभरात त्याची लोकप्रियता वाढली.