मुंबई : खून करून पळणाऱ्या आरोपीला अटक | Wadala Railway Police recently arrested an accused who killed a person and threw the body on the railway tracks mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई : खून करून पळणाऱ्या आरोपीला अटक

मृतदेह रेल्वे रुळावर फेकून अपघाती मृत्यू असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : खून करून पळणाऱ्या आरोपीला अटक
कोथरुडमधील गुंडाच्या विरोधात झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई

हार्बर मार्गावरील टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान जुलै २०२१ मध्ये एका व्यक्तीचा खून करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देणारा मुख्य आरोपी विकास उर्फ आशाराम स्वामीदयाल पासवान याला वडाळा रेल्वे पोलिसांनी नुकतीच अटक केली.टिळकनगर येथे राहणारा अजय कुमार सिंग याला जुलै २०२१ रोजी तीन-चार जणांच्या टोळीने लाकडी सळीने मारहाण केली. त्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून अपघाती मृत्यू असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आपला भाऊ अजय कुमार सिंगचा खून करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकण्यात आल्याची तक्रार प्रदीप सिंग याने वडाळा पोलीस ठाण्यात केली.

हेही वाचा >>> “मग घ्या ना धौती योग”, आशिष शेलारांचा शिवसेनेला खोचक टोला; ‘थापां’चाही केला उल्लेख!

वडाळा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान ऑगस्ट २०२१ रोजी सानपाडा येथून आरोपी जॉन आदिमलंग हरिजन (२३) आणि उत्तर प्रदेश येथून आरोपी अखिलेश कुमार दुबे (३४) याला खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि अन्य एका साथीदाराचा शोध रेल्वे पोलीस घेत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी आरोपी विकास कळव्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तत्काळ वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एम. खुपेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा परिसरातून आरोपी विकासला मंगळवारी अटक केली. तसेच, अन्य एका साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती वडाळा रेल्वे पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
खड्डेमय आणि ओबडधोबड रस्त्यासाठी मुंबई महानगरपालिकेला दंड का करू नये ;सामाजिक संस्थांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

संबंधित बातम्या

फ्रिजमधून खोके कुठे गेले याचा शोध घेणार ! ; मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
राज्यपालांना केंद्र सरकारचे तूर्त अभय; ‘महाराष्ट्र बंद’बाबत महाविकास आघाडीकडून आज निर्णय?
सीसीटीव्हींनाही नियम हवेत
बलात्कार प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या मनसे पदाधिकाऱ्याचं राज ठाकरेंना पत्र; म्हणाला, “साहेब माझ्या काही…”
सदनिका हस्तांतरणासाठी शासनमान्यतेची गरज नाही; १९८३ पूर्वी दिलेल्या जमिनींबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Fifa World Cup 2022: मेस्सी-रोनाल्डोचे संघ होणार बाहेर? विश्वचषकाचे फसले गणित, जाणून घ्या समीकरण
यामी गौतमचा ‘लॉस्ट’ हा थरारपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
फेसबुक व्हेरिफाइड बॅज हवा आहे? मग ‘या’ बाबींची पूर्तता करणे गरजेचे, जाणून घ्या प्रक्रिया
“आता मंदाकिनी हो..” ट्विंकल खन्नानं सांगितली दिग्दर्शकाच्या फर्माईशीची आठवण
VIDEO: धक्कादायक! श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न