मुंबई: पक्ष आणि चिन्ह यावर दावा सांगण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विधिमंडळातील सदस्य संख्येच्या आधारे पक्ष आणि चिन्ह आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे. तर पक्ष, संघटना पातळीवर पदाधिकारी यांनी निवडणूक प्रक्रियेने केलेल्या अध्यक्ष निवडीविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडील निकालाच्या आधारे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सहा ऑक्टोबरला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह याबाबत सुनावणी होणार आहे. आम्हाला बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असून नागालँडमधील आमदारांचेही समर्थन असल्याचा दावा अजित पवार
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: War between both factions of ncp to claim party symbols ysh