लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अमर महल जंक्शन येथे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला धक्का लागल्याने शनिवार, १९ एप्रिल रोजी सकाळी ८ च्या सुमारास मोठी गळती सुरू झाली. जलअभियंता विभागाकडून युद्धपातळीवर गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी जवळपास २४ तास जलवाहिनी बंद करणे गरजेचे असल्यामुळे शहर आणि पूर्व उपनगरातील काही भागांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला.

गोवंडी – मानखुर्द , चेंबूर, घाटकोपर, कुर्ला, शीव, चुनाभट्टी, लालबाग, शिवडी, वडाळा, माटुंगा, दादर आदी विविध परिसरातील नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. जलवाहिनीला गळती लागल्याचे समजताच पालिकेच्या जलअभियंता विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीकाम हाती घेतले. या दुरुस्तीकामासाठी २४ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, पाण्याचा काटकसरीने पाणी वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. जलवाहिनी दुरुस्ती झाल्यानंतर संबंधित विभागातील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात येणार आहे.

निष्काळजी कंत्राटदाराविरोधात कारवाई करणार

अमर महल जंक्शन येथे मेट्रो प्रकल्पाअंतर्गत खांब उभारण्याचे (पायलिंग) काम सुरू आहे. या कामासाठी खोदकाम करण्यात आले. मात्र, कंत्राटदराने आवश्यक खबरदारी न घेतल्याने शनिवारी सकाळी १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला धक्का लागला आणि मोठी गळती सुरू झाली. जलवाहिनीचे मोठे नुकसान झाले असून पूर्व उपनगर व शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. खोदकाम करताना आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळे कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. संपूर्ण नुकसानाचा आढावा घेऊन कंत्राटदारावर कारवाई करण्यात येणार आहे.

दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

जलवाहिनीतून होत असलेल्या गळतीची माहिती मिळताच महापालिकेच्या जल अभियंता खात्यातील कामगार, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पालिकेचे ५० ते ६० कामगार जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. येत्या २४ तासांच्या आतच दुरुस्तीकाम पूर्ण होईल, असा विश्वास जल खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी पालिकेच्या एम पश्चिम, एम पूर्व, एन, एल, एफ उत्तर, एफ दक्षिण आदी विभागातील पाणीपुरवठा २४ तासांसाठी खंडित करण्यात आला आहे.

‘या’ भागांत पाणी नाही

१) एम पश्चिम विभाग – वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ कॉलनी, लालडोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क, लालवाडी, मैत्री पार्क, अतूर पार्क, सुमन नगर, साईबाबा नगर, श्यामजीवी नगर, घाटला, अमर नगर, मोतीबाग, खारदेव नगर, पोस्टर कॉलनी, एस. टी. मार्ग, सी. जी. गिडवाणी रस्ता, उमरशी बाप्पा चौक, चेंबूर नाका, चेंबूर बाजार, चेंबूर कॅम्प, वाशी गाव, भक्ती पार्क, आंबापाडा, माहूल गाव, म्हाडा बिल्डींग, म्हैसूर कॉलनी, जिजामाता नगर, माहूल रोड, एम. एस. बिल्डींग, राम टेकडी, सिंधी सोसायटी, चेंबूर कॉलनी, कलेक्टर कॉलनी, मारवली चर्च, नवजीवन सोसायटी, बसंत पार्क, युनियन पार्क, चरई व्हिलेज, गोल्प्फ क्लब, व्ही. एन. पुरव मार्ग, आर. सी. मार्ग या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

२) एम पूर्व विभाग – अहिल्याबाई होळकर मार्ग, रफिक नगर, बाबा नगर, आदर्श नगर, संजय नगर, निरंकार नगर, ९० फूट रस्ता क्रमांक १३,१४,१५ मंडाला, २० फूट, ३० फूट रस्ता, एकता नगर, म्हाडा इमारती, कमलरामन नगर, बैंगनवाडी मार्ग क्रमांक १०-१३, आदर्श नगर; रमण मामा नगर, शिवाजी नगर रस्ता क्रमांक ६ ते १०, शास्त्री नगर, चर्च रोड, संजय नगर भाग -२, शिवाजी नगर रस्ता क्रमांक १ ते ६, चर्च रोड, जनता टिंबर मार्ट परिसर, लोटस कॉलनी, अब्दुल हमीद मार्ग; गौतम नगर, गोवंडी स्थानक मार्ग, दत्त नगर, केना बाजार; देवनार महानगरपालिका वसाहत, साठे-नगर, झाकीर हुसेन नगर, लल्लूभाई इमारती, जनकल्याण सोसायटी, मानखुर्द, पी. एम. जी. पी. कॉलनी, डॉ. आंबेडकर नगर, साठे नगर, लल्लूभाई/हिरानंदानी इमारती, जे. जे. मार्ग (ए, बी, आय, एफ क्षेत्र), सी, डी, ई, जी, एच, जे, के क्षेत्र, चिताकॅम्प, कोळीवाडा, पायलीपाडा, ट्रॉम्बे, कस्टम मार्ग, दत्तनगर, बालाजी मंदिर मार्ग, देवनार गाव रस्ता, गोवंडी गाव, व्ही. एन. पुरव मार्ग, बी. के. एस. डी. मार्गाजवळील भाग, दूरसंचार कारखाना, बीएआरसी, नेव्हल डॉकयार्ड्स मानखुर्द, मंडाले गाव, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गाव; एसपीपीएल इमारती, महाराष्ट्र नगर, समता चाळ, भीम नगर रहिवाशी संघ, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर, देवनार फार्म मार्ग, बोरबादेवी, घाटला, बीएआरसी कारखाना, बीएआरसी कॉलनी, गौतम नगर, पांजरापोळ या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

३) एन विभाग – घाटकोपर पूर्वेतील राजावाडी पूर्वेकडील संपूर्ण परिसर, चित्तरंजन नगरसह विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, एम. जी. मार्ग, पंतनगर, न्यू पंतनगर, विक्रांत सर्कल, पटेल चौक, आंबेडकर सर्कल, ९० फूट रस्ता, लक्ष्मी नगर, लक्ष्मीबाग, गरोडिया नगर, नायडू कॉलनी, शास्त्रीनगर, गुरुनानक नगर, जवाहर मार्ग, गौरीशंकर मार्ग, रमाबाई नगर, कामराज नगर, नेताजी नगर, चिरागनगर, आझाद नगर, गणेश मैदान पारशीवाडी, न्यू माणिकलाल इस्टेट मार्ग, एन. एस. एस. मार्ग, महिंद्रा पार्क, डी. एस. पथ, खलाई गाव, किरोळ गाव, विद्याविहार पश्चिम, हंसोटी गल्ली, खोत गल्ली, एम. जी. मार्ग, नवरोजी गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, जे. व्ही. मार्ग, ध्रुवराजसिंग गल्ली, गोपाल गल्ली, जीवदया गल्ली, गिगावडी, भीमनगर, पवार चाळ, लोअर भीमनगर, गुन्हे शाखा परिसर, वैतागवाडी, नित्यानंद नगर, सीजीएस कॉलनी, गंगावाडी, एमटीएनएल गल्ली, एजीएलआर मार्ग, एलबीएस मार्गालगतचा परिसर घाटकोपर (पश्चिम) श्रेयस सिग्नल इत्यादी पर्यंत. सॅनिटोरियम गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, काम गल्ली, श्रद्धानंद रस्ता, जे. व्ही. मार्ग, गोपाळ गल्ली, एलबीएस मार्ग घाटकोपर (पश्चिम), गांधी नगर शेजारील परिसर. या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

४) एल विभाग – नवीन टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला पूर्व मधील नेहरू नगर, मदर डेरी रोड, कसाई वाडा, चुनाभट्टी परिसर, राहुल नगर व एवरार्ड नगर, नेहरू नगर, शिवसृष्टी मार्ग, नाईक नगर, मदर डेअरी मार्ग, एस. जी. बर्वे मार्ग कुर्ला (पूर्व), केदारनाथ मंदीर मार्ग, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलीस वसाहत, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, टिळक नगर, कुरेशी नगर, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, स्थानक मार्ग, राहुल नगर, एवरद नगर, पानबाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अलीदादा मार्ग, स्वदेशी जेवण चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडाकोळ प्रेम नगर, हिल रोड, मुक्तता देवी मार्ग, ताडवाडी, समर्थ नगर या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

५) एफ उत्तर विभाग – शीव पश्चिम आणि पूर्व, दादर (पूर्व), माटुंगा (पूर्व), वडाळा, चुनाभट्टीचा भाग, प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, अल्मेडा कंपाऊंड, पंचशील नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, लोढा इमारती (नवीन कफ परेड), शीव कोळीवाडा-सरदार नगर, संजय गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, कोरबी मिठागर, वडाळा येथील द्वार क्रमांक ४ आणि ५, भिमवाडी या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६) एफ दक्षिण विभाग – रुग्णालय क्षेत्र : केईएम रुग्णालय, टाटा, बाई जेरबाई वाडिया, एमजीएम रुग्णालय, शिवडी (पूर्व) विभाग- शिवडी किल्ला रस्ता, गडी अड्डा, शिवडी कोळीवाडा, शिवडी (पश्चिम) विभाग- आचार्य दोंदे मार्ग, टी. जे. मार्ग, झकेरिया बंदर मार्ग, शिवडी छेद मार्ग, गोलंजी इनपुट, परळ गाव पंप झोन- गं.द. आंबेकर मार्ग ५० सदनिकांपर्यंत, एकनाथ घाडी मार्ग, परळ गाव रस्ता, नानाभाई परळकर मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळिंबे मार्ग, एस. पी. कंपाउंड, काळेवाडी झोन- परशुराम नगर, जिजामाता नगर, आंबेवाडी, साईबाबा मार्ग, मिंट कॉलनी, राम टेकडी, नायगाव पंप झोन- जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रिंग मिल चाळ, गं. द. आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेट्ये मंडई, भोईवाडा गाव, हाफकिन इन्स्टिट्यूट, दादर, जगन्नाथ भातणकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणी रस्ता, हिंदमाता यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग, डॉ. बी.ए.रोड चिवडा गल्ली, डॉ. एस.एस.राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजिभोय मार्ग, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी क्षेत्र, अभ्युदय नगर या भागांमध्ये पाणीपुरवठा अंशत: बंद राहील.