scorecardresearch

पूर्व उपनगरांत पाणीकपात ; पुढील आठवडय़ात एन विभागातील सूक्ष्मबोगदा जलवाहिनीचे काम

पुढील आठवडय़ात पूर्व उपनगरे व शहराच्या काही भागात २४ तासांसाठी पाणीकपात करण्यात येणार

मुंबई : जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे सध्या मुंबईतील विविध ठिकाणच्या रहिवाशांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. पुढील आठवडय़ात पूर्व उपनगरे व शहराच्या काही भागात २४ तासांसाठी पाणीकपात करण्यात येणार असून काही भागांत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेतर्फे पूर्व उपनगरामध्ये ‘एन’ विभागातील सोमय्या नाल्याखालून महापालिका वसाहत, विद्याविहार या ठिकाणी सूक्ष्मबोगदा (मायक्रोटनेलिंग) पद्धतीने जलवाहिन्या वळविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. बुधवार, १८ मे रोजी सकाळी १०.००  वाजल्यापासून गुरुवार, १९ मे रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत हे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत पूर्व उपनगरांमध्ये काही भागात पाणीपुरवठा बंद राहील. तसेच शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. कुर्ला, घाटकोपर, विद्याविहार, चेंबूर, टिळकनगर याबरोबर शहर भागातील लालबाग, परळ, नायगाव, शिवडी परिसरांतील पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे.

या काळात कुर्ला येथील राहुल नगर, एडवर्ड नगर, पानबजार, व्ही. एन. पुरव मार्ग, नेहरू नगरच्या दोन्ही बाजू, जागृती नगर, शिवसृष्टी नगर, एस. जी. बर्वे मार्ग, कसाईवाडा पंपिंग, हिल मार्ग, चाफे गल्ली, चुनाभट्टी पंपिंग स्वदेशी मिल मार्ग येथील पाणीपुरवठा पूर्ण बंद राहील. 

राजावाडीचे सर्व क्षेत्र, चित्तरंजन नगर वसाहत, आंबेडकर नगर, निळकंठ व्हॅली, राजावाडी रुग्णालय परिसर, विद्याविहार स्थानक, पूर्व बाजूचा रस्ता, ओएनजीसी वसाहत, मोहन नगर, कुर्ला टर्मिनल मार्ग, ओघड भाई रस्ता, आनंदी रस्ता रामजी, आशर रस्ता येथील पाणीपुरवठाही बंद राहणार आहे. टिळक नगर सर्व क्षेत्र, ठक्कर बाप्पा वसाहत, वत्सलाताई नगर, सहकार नगर, आदर्श नगर, राजा मिलिंद नगर, राजीव गांधी नगर, गोदरेज आवार, कुटीरमंडल, सम्राट अशोक नगर येथील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.  तसेच शहर भागात वडाळा ट्रक टर्मिनल, न्यू कफ परेड, प्रतीक्षा नगर, पंचशील नगर, शीव पूर्व आणि पश्चिम (बुस्टिंग), शीव कोळीवाडा, संजय गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, सरदार नगर, इंदिरा नगर, वडाळा मोनोरेल डेपो या परिसरात कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. दादर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातनकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणे मार्ग, हिंदमाता येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.  परळ, लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली येथे  कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water cut in in the eastern suburbs of mumbai zws