आरोपीची कबुली; आतापर्यंत १३ अटकेत

मुंबई : शहरात आयोजित बोगस लसीकरण शिबिरांमध्ये करोना प्रतिबंधात्मक लशीऐवजी नागरिकांना पाण्याचा ‘डोस’ देण्यात आल्याचे पुरावे हाती लागल्याचे गुरुवारी पोलिसांनी सांगितले. शिवम रुग्णालयाच्या डॉ. नीता पटारिया, दंतवैद्यक मनीष त्रिपाठी आणि मालाड मेडिकल असोसिएशनचे माजी पदाधिकारी महेंद्र प्रताप सिंग या गुन्ह््याचे सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा आहे. या तिघांनी कट आखला आणि अधिकाधिक बोगस शिबिरे आयोजित करता यावीत या दृष्टीकोनातून अन्य आरोपींना टोळीत सहभागी करून घेतल्याची माहितीही पोलिसांनी दिली. विशेष तपास पथकाने या घोटाळ्यात आतापर्यंत १३ आरोपींना अटक के ली आहे.

सहआयुक्त(कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष तपास पथकाने शिवम रुग्णालयाच्या प्रशासकीय विभागात काम करणाऱ्या राहुल दुबे याला अटक के ली. २५ मे ते ६ जून दरम्यान शहरात नऊ ठिकाणी आयोजित के लेल्या शिबिरांसाठी शिवम रुग्णालयाने वापर करून टाकलेल्या कु प्यांमध्ये पाणी भरले आणि कोव्हॅक्सीन व कोव्हीशील्डची लस म्हणून नागरिकांना टोचल्याचे दुबे याने कबूल के ले. नियमाप्रमाणे रिकामी लसकु पी चुरगळून नष्ट करणे अपेक्षित होते. मात्र रुग्णालयाने तो नियम मोडला. रिकाम्या कु प्यांमध्ये पाणी भरून नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचे भक्कम पुरावे विशेष तपास पथकाने गोळा के ले आहेत. या प्रकरणातील फरार आरोपी राजेश पांडे याला बारामती येथील एका विश्रामगृहातून अटक के ल्याची माहितीही त्यांनी दिली. पांडे कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात नियुक्त होता. हा घोटाळा उघडकीस येताच रुग्णालयाने त्याला कामावरून कमी के ले होते.

शिवम रुग्णालयास महापालिके ने खासगी लसीकरण शिबिरे आयोजित करण्याची परवानगी दिली होती. त्यासाठी आवश्यक असलेला लससाठाही रुग्णालयाने मिळवला होता. मात्र एक लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचा त्यांनी चंग बांधला. इतक्या मोठया प्रमाणावर लस विकत घेण्यासाठी पाच ते सहा कोटी रुपयांची निकड होती. ही रक्कम उभी करण्यासाठी बोगस लसीकरण शिबिरांचा घाट घातला गेला. अतिरिक्त लससाठा प्राप्त के ल्यावर त्याद्वारे जे लसीकरण होईल त्यातून बोगस शिबिरांद्वारे फसवणूक झालेल्या नागरिकांना प्रमाणपत्र देण्याचा कट आरोपींनी आखला होता. त्यामुळेच ते या नऊ शिबिरांमधील नागरिकांना प्रमाणपत्र देण्यास चालढकल करत होते. याशिवाय शासन, महापालिका हा घोटाळा पकडू शकणार नाही, नागरिकांनाही संशय येणार नाही, असा विश्वास आरोपींना होता, अशी माहिती तपासाशी संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गुन्हा दाखल…

या टोळीने आणखी एक बोगस लसीकरण शिबिर आयोजित के ल्याची माहिती गुरुवारी पुढे आली. एमआयडीसीतील इंटर गोल्ड (इंडिया) कं पनीत या टोळीने २८ एप्रिल, ७-८ मे आणि १२ जूनला टप्प्याटप्प्यात १,०४० कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण शिबिर आयोजित के ले होते. त्यापैकी ४८ जणांनाच प्रमाणपत्र देण्यात आले. त्यावर तारखांचा घोळ होता. ही बाब लक्षात येताच कं पनीने गुरुवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे डॉ. मनीष त्रिपाठी, अरविंद जाधव, शिवम रुग्णालयाचे संचालक पवन सिंग, अनुराग, महोम्मद करीम अली, नेहा शर्मा, रोशनी पटेल यांच्यासह इतर व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलीस उपायुक्त महेश्वार रेड्डी यांनी दिली.