वनडे पिकनिकसाठी हे आहेत मुंबईजवळचे पाच बेस्ट ‘Water park’

सध्या शाळा, कॉलेजना सुट्टी असल्यामुळे वेगवेगळे ग्रुप्स, फॅमिली कुठेना कुठे पिकनिकला जाण्याचा प्लान करत असतील. ज्यांना गावी किंवा तीन-चार दिवसांसाठी थंड हवेच्या ठिकाणी जाणे शक्य नाही.

(संग्रहित छायाचित्र)
सध्या शाळा, कॉलेजना सुट्टी असल्यामुळे वेगवेगळे ग्रुप्स, फॅमिली कुठेना कुठे पिकनिकला जाण्याचा प्लान करत असतील. ज्यांना गावी किंवा तीन-चार दिवसांसाठी थंड हवेच्या ठिकाणी जाणे शक्य नाही अशांचा वनडे पिकनिकवर भर असेल. उन्हाळयाच्या या दिवसांमध्ये समुद्र किनारे, वॉटर पार्कला पर्यटकांती जास्त पसंती असते. आम्ही तुम्हाला वनडे पिकनिकचे बेस्ट स्पॉट ठरु शकतील अशा मुंबई जवळच्या पाच वॉटर पार्कची माहिती देत आहोत.

वॉटर किंगडम
वॉटर किंगडम हे आशियातील थीम आधारीत सर्वात मोठे वॉटर पार्क आहे. मुख्य म्हणजे मुंबईपासून हे अत्यंत जवळ असलेले वॉटर पार्क आहे. इथे लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वच वेगवेगळया राईडसचा आनंद लुटू शकतात. महत्वाच म्हणजे हे वॉटर पार्क मुंबईच्या जवळ असल्यामुळे तुमचा प्रवासाचा भरपूर वेळ वाचतो. बोरीवली पश्चिमेला एस्सल वर्ल्डच्या बाजूलाच हे वॉटर पार्क आहे.

इथे कसे पोहोचाल
वेर्स्टन एक्सप्रेस हायवे तसेच मीरा-भाईंदर मार्गाने तुम्ही जाऊ शकता.
ट्रेनने बोरीवली स्टेशनवर उतरल्यानंतर तिथून बसने गोराईला जा.
गोराई जेट्टीवरुन एस्सल वर्ल्डची बोट तुम्हाला वॉटर किंगडमला घेऊन जाईल.

वॉटर किंगडमची वेळ आणि प्रति व्यक्ति किती शुल्क आकारले जाते त्याची माहिती तुम्हाला http://www.waterkingdom.in/travel/home या वेबसाईटवर मिळू शकते.

ग्रेट एस्केप वॉटर पार्क
ग्रेट एस्केप वॉटर पार्कही ग्रुप्स आणि फॅमिली पिकनिकसाठी उत्तम स्पॉट आहे. इथेही तुम्हाला वेगवेगळया राईडसमध्ये पाण्यात खेळण्याचा आनंद लुटू शकता. किंमतीचा विचार करताही हे वॉटर पार्क अन्य पार्कच्या तुलनेत थोडे स्वस्त आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पारोल-भिवंडी रोडवर विरार पूर्वेला हे वॉटर पार्क आहे.

कसे पोहोचाल
पश्चिम रेल्वेमार्गावरुन लोकल ट्रेन पकडल्यानंतर वसई स्टेशनला उतरा. वसई पश्चिमेकडून रिक्षा पकडून तुम्ही थेट ग्रेट एस्केप वॉटर पार्कला येऊ शकता.

ग्रेट एस्केप वॉटर पार्कची वेळ आणि प्रति व्यक्ति किती शुल्क आकारले जाते त्याची माहिती तुम्हाला http://www.greatescape.co.in या वेबसाईटवर मिळू शकते.

सूरज वॉटर पार्क
सूरज वॉटर पार्कही मुंबई आणि ठाण्यापासून अत्यंत जवळ असलेले ठिकाण आहे. सूरज वॉटर पार्क ठाण्यापासून फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे. या वॉटर पार्कला वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. ११ एकरमध्ये पसरलेल्या या वॉटर पार्कमध्ये लहानांपासून मोठयांसाठी वेगवेगळया राईडस उपलब्ध आहेत.

कसे पोहोचाल 

ठाणे पश्चिमेला घोडबंदर रोडवर हे वॉटर पार्क आहे.

मध्य रेल्वे मार्गावरुन ट्रेन पकडल्यानंतर ठाण्यात उतरा. तिथून सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसने किंवा रिक्षाने तुम्ही सूरज वॉटर पार्कला सहज पोहोचू शकता. ठाणे स्टेशनपासून सात किलोमीटर आणि बोरीवलीपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे.

सूरज वॉटर पार्कची वेळ आणि प्रति व्यक्ति किती शुल्क आकारले जाते त्याची माहिती तुम्हाला http://www.surajwaterpark.com या वेबसाईटवर मिळू शकते.

टिकूजी नी वाडी वॉटर पार्क
टिकूजी नी वाडी हे ठाण्यात असलेले आणखी एक वॉटर पार्क आहे. ठाण्यात घोडबंदर रोडवरच कोकणीपाडा येथे हे पार्क आहे. इथे सुद्धा सर्वांना वनडे पिकनिकचा मनमुराद आनंद लुटता येईल अशा राईडस आहेत.

ठाणे घोडबंदर रोडवर मानपाडा टाटा पॉवर हाऊसच्या विरुद्ध दिशेला टिकूजी नी वाडी वॉटर पार्क आहे.
इर्स्टन एक्सप्रेस व तसेच ट्रेनने ठाण्याला पोहोचल्यानंतर तुम्ही इथे सहज येऊ शकता.

टिकूजी नी वाडी वॉटर पार्कची वेळ आणि प्रति व्यक्ति किती शुल्क आकारले जाते त्याची माहिती तुम्हाला http://www.tikuji-ni-wadi.com या वेबसाईटवर मिळू शकते.

रॉयल गार्डन वॉटर पार्क
रॉयल गार्डन वॉटर पार्क हा मुंबईजवळ असलेले आणखी एक चांगला पिकनिक स्पॉट आहे. १५ स्लाईडस, चार स्विमिंग पूल आणि एक व्हेव पूल इथे आहे. रेन डान्स तसेच डॅशिंग कार राईडची सुद्धा सुविधा आहे.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर दहीसर चेकनाक्यापासून ९ किलोमीटर अंतरावर हे वॉटर पार्क आहे.

रॉयल गार्डन वॉटर पार्कची वेळ आणि प्रति व्यक्ति किती शुल्क आकारले जाते त्याची माहिती तुम्हाला https://royalgarden.in/waterpark-in-mumbai.html या वेबसाईटवर मिळू शकते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Water parks near to mumbai