लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या मुख्‍य जलवाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी येत्या शनिवारी ११ मे रोजी कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरात आठ तासासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Worli Sea Coast Road marathi news
सागरी किनारा मार्गावर वरळीत वाहतूक कोंडी, हाजीअली – वरळी रस्ता खुला करूनही पहिल्याच दिवशी वाहनचालकांना त्रास
Traffic, Mumbai-Goa highway,
तीन दिवस मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक चार तास बंद राहणार
Thane, Railway, disrupted, heavy rain,
ठाणे : मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत, लोकल गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने
Part of the roof of the flyover collapsed on the car luckily no one was injured
मुंबई : मोटारीवर उड्डाणपुलाच्या छताचा भाग कोसळला, सुदैवाने कोणीही जखमी नाही
At Andheri Sahar main water channel collapsed part of water key collapsed
अंधेरी सहार येथे मुख्य जलवाहिनी खचली, पाण्याच्या चावीचा भाग खचला
Mumbai Nashik highway is delayed for six hours to cover two hours due to pothole
मुंबई-नाशिक महामार्ग ‘खड्ड्यात’; दोन तासांचे अंतर कापण्यासाठी सहा तास खोळंबा
Thane Traffic Chaos, Mumbai Nashik Highway, Thane Traffic Chaos on Mumbai Nashik Highway, Seven Hour Delays, Roadworks and Heavy Vehicle Load, thane news, marathi news
मुंबई-नाशिक महामार्गावरील कोंडीमुळे नागरिक हैराण, ठाणे ते आसनगाव या दोन तासांच्या अंतरासाठी लागताहेत सात तास
Arrival of Saint Nivrittinath palanquin in the city change in traffic route
संत निवृत्तीनाथ पालखीचे शहरात आगमन, वाहतूक मार्गात बदल

चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या मुख्‍य जलवाहिनीला फुटल्यामुळे गळती सुरू झाली आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी ११ मे रोजी दुपारी ३.३० ते रात्री ११.३० या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या करणास्तव मुंबई महापालिकेने पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आठ तासांच्या कालावधीत कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरास होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. तर, नौदलास रात्री होणारा पुरवठा दुरुस्तीनंतर म्हणजेच विलंबाने होणार आहे.

आणखी वाचा-मुंबई: शिवडी-वरळी उन्नत रस्त्याचे ६५ टक्के काम पूर्ण, पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाणार

महानगरपालिकेच्या ए विभागात पाणीपुरवठा करण्यासाठी क्रॉस मैदान बोगद्यातून १५०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीद्वारे पुढे १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीचा उपयोग केला जातो. या जलवाहिनीवरुन होणारा पुरवठा हा कमी दाबाने तसेच कमी प्रमाणात होत असल्याचे आढळल्यानंतर शोध घेण्यात आला. त्यावेळी, मंत्रालय इमारतीजवळ जीवन विमा मार्ग येथे मेट्रो ३ चे काम सुरू असताना या १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीस गळती झाल्‍याचे निदर्शनास आले. त्यानंतर महानगरपालिकेच्या तातडीच्या दुरूस्‍ती विभागाने घटनास्‍थळी पाहणी केली जलवाहिनीची ही गळती लवकरात लवकर दुरुस्त करावी लागणार आहे, अन्यथा गळतीमुळे पाणी वाया जाण्यासह रस्ता खचण्याचा धोका देखील निर्माण होवू शकतो.

तसेच मंत्रालय व मरीन ड्राइव्ह हा परिसर आत्यंतिक महत्त्वाचा असल्याने महानगरपालिकेने मरीन ड्राइव्ह वाहतूक पोलिसांशी तातडीने संपर्क साधून या दुरुस्ती कामाचे प्राधान्य कळवले आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन होण्याच्या दृष्टिने पालिकेने दुरुस्ती कामाची परवानगी घेतली आहे. या कामासाठी सकाळी ९ वाजल्यापासून खोदकाम सुरु केले जाईल. तर जलवाहिनीतील पाणी उपसा करुन नंतर प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम दुपारी ३.३० वाजल्यापासून केले जाईल.

आणखी वाचा-मुंबई: तीन संजय पाटील, दोन अरविंद सावंत निवडणूकीच्या मैदानात

कुलाबा, कोळीवाडा येथे शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर नौदलास रात्री १०.३० ते पहाटे २.५० या कालावधीत केला जाणारा नियमित पाणीपुरवठा हा दुरूस्‍ती काम पूर्ण झाल्यानंतर, जलवाहिन्या भारीत (चार्जिंग) करुन त्यानंतर म्हणजेच पाणीपुरवठ्याच्या नेहमीच्या वेळेपेक्षा विलंबाने होणार आहे.