मुंबई : जलवाहिनीची दुरुस्ती आणि अन्य कामांमुळे मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजल्यापासून ३० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुंबईतील १२ विभागांतील पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे. पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील ३०० मिलीमीटर व्यासाच्या बाह्यवळण जलवाहिनीतून होणाऱ्या गळतीच्या दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय एक आणि दोनसाठी १८०० मिलीमीटर व्यासाच्या नवीन वाहिनीचे जोडकाम मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजतापासून बुधवारी ३० नोव्हेंबर सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

या कालावधीत वांद्रे ते गोरेगाव, भांडुप, कुर्ला, विद्याविहार या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. तर, अंधेरी, विलेपार्ले पश्चिम विभागातील परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित  राहील. अंधेरी पूर्व, दादर , माहीम, गोरेगाव  विभागांतील काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Bhandara district, enthusiastic voters, hot sun, 34 percent polling, till 1 pm, bhandra lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, bhandara polling news, marathi news, polling day, voters, voters in bhandara,
भंडारा जिल्ह्यात तळपत्या उन्हातही मतदारांमध्ये उत्साह….दुपारी १ पर्यंत ३४.५६ टक्के मतदान…
water supply through tankers
दुष्काळ ; ५,००० गावे टँकरग्रस्त
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
दत्ता जाधव possibility of light rain across maharashtra for four days from 5 april
राज्यात शुक्रवारपासून चार दिवस पावसाचा अंदाज