Premium

जोगेश्वरी, अंधेरी, सांताक्रूझ, विलेपार्ले पूर्व भागात सोमवारी पाणीपुरवठा बंद

संबंधित परिसरातील नागरिकांनी वरील कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा.

water cut
जोगेश्वरी, अंधेरी, सांताक्रूझ, विलेपार्ले पूर्व भागात सोमवारी पाणीपुरवठा बंद

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या ‘के – पूर्व’ विभागकार्यालयाच्या हद्दीतील महाकाली गुंफा मार्गावरील ‘रम्य जीवन सोसायटी’जवळ, तसेच कार्डिनल ग्रेसीयस मार्ग व बी. डी. सावंत मार्ग चौक, अंधेरी (पूर्व)’ येथे नवीन १५०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी आणि १२०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) जोडण्याचे काम सोमवार, ५ जून २०२३ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ‘के – पूर्व’ आणि ‘के – पश्चिम’ विभागातील काही भागात १६ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जलवाहिन्या जोडण्याच्या कामामुळे वरील कालावधीत जोगेश्वरी (पूर्व) परिसरातील त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, दुर्गा नगर, मातोश्री क्लब, सारीपुत नगर, दुर्गा नगर या भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे. त्याचबरोबर वरील कालावधीत अंधेरी (पूर्व), विलेपार्ले (पूर्व) आणि सांताक्रूझ (पूर्व) येथील काही भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. संबंधित परिसरातील नागरिकांनी वरील कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 17:51 IST
Next Story
मुंबई : वाढदिवसाच्या पार्टीनंतर डीजेच्या पैशांवरून मित्राची हत्या