रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात येत आहेत. आतापर्यंत अनेक भारतीयांना परत आणलं असून बचावकार्य सुरूच आहे. अशातच युक्रेनमध्ये आम्हाला भारतीय दूतावासाची काहीही मदत झाली नाही, अशी भावना युक्रेनवरून भारतात परतलेल्या प्रचीती पवार नावाच्या विद्यार्थिनीने व्यक्त केली आहे.

रशियन सैनिकांनी केलं भारतीय विद्यार्थिनींचं अपहरण; एका विद्यार्थिनीनं सांगितला भयानक अनुभव

happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री

प्रचीती सांगते की, “युक्रेन आणि रशियात युद्ध सुरू झाल्यावर आम्हाला भारतात परत येण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने योग्य वेळी काहीच मदत झाली नाही. आम्हाला युध्दाची सूचना आधीच देण्यात आली होती, मात्र ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो, त्या ठिकाणापासून विमानतळं खूप अंतरावर होती. त्यामुळे आम्ही विमानतळापर्यंत पोहचणं हेच खूप जिकरीचं होतं. कारण तिथं पोहोचे पर्यंत आमचा जीवही जाऊ शकत होता. मात्र, त्यावेळी भारतीय दूतावासाने आम्ही संपर्क करूनही काहीच प्रतिसाद दिला नाही,” असं तिने म्हटलंय.

Ukraine War: मोठी बातमी! युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

पाच मिनिटात तिकिटाचे दर वाढत होते, दर लाखांच्यावर झाले होते जे आम्हाला परवडणारे नव्हते. मात्र, अशावेळी भारतीय दूतावासाकडून जी मदत हवी होती ती मिळाली नाही. अजूनही माझ्या सोबत असलेले आणि इतर असे खूप विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत. त्यांची केंद्र सरकारने मदत करावी, त्यांना सुखरुप मायदेशी परत आणावं, अशी विनंती युक्रेन मधून परत आलेल्या प्रचीती पवार हिने केंद्र सरकारला केली आहे.