scorecardresearch

Premium

‘जगण्यातला आनंद वाढवणारे नागरीकरण हवे’

‘शहर आणि पर्यावरणा’चा विचार करताना शहरातील ६० टक्के प्रदूषण हे वाहनांमुळे होते हे लक्षात घेतले पाहिजे.

‘जगण्यातला आनंद वाढवणारे नागरीकरण हवे’

शहरीकरणाचा वाढता वेग थांबवणे आपल्याला शक्य नाही. उलट, पुढच्या पंधरा वर्षांंत ६५ टक्क्याने शहरीकरण वाढणार असून, त्याची मोठी जबाबदारी भारत, चीनसह अन्य आशियाई देशांवर राहणार आहे. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशा पद्धतीने नागरीकरणाचे नियोजन झाले पाहिजे. कमीत कमी ऊर्जा वापरून माणसाची क्रयशक्ती वाढवणे, राहणीमानाचा निर्देशांक वाढवणे, पर्यावरण संवर्धन हे उद्देश समोर ठेवून यापुढे शहरांचे नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अंतिमत: तुमच्या आनंदाचा निर्देशांक हा तुमच्या आजूबाजूचे वातावरण किती चांगले आहे यावर अवलंबून असतो. त्यामुळे नागरीकरण होणारच ते सुखकारक कसे होईल, याचा विचार करून नियोजन होईल, असे आश्वासन ‘शहर आणि पर्यावरण’ या विषयावरील दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातील परिसंवादातून ‘पुणे प्रदेश शहर विकास प्राधिकरणा’चे आयुक्त महेश झगडे यांनी दिले.
‘शहर आणि पर्यावरणा’चा विचार करताना शहरातील ६० टक्के प्रदूषण हे वाहनांमुळे होते हे लक्षात घेतले पाहिजे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देण्यासारखे वेगळे मार्ग शोधले पाहिजेत, असे मत प्रा. विद्याधर वालावलकर यांनी व्यक्त केले. तर शहरांचे पर्यावरण अबाधित राखून विकासाचे नियोजन करताना शहरातील पुरातन वास्तू, नद्या, नद्यांचे घाट, डोंगर आणि डोंगरउताराकडचा भाग यांना वगळून विकासकामे झाली पाहिजेत, असा मुद्दा अभ्यासक सुजित पटवर्धन यांनी मांडला. तर ‘प्रकाश प्रदूषण’ ही नवीन संकल्पना खगोल मंडळ संस्थेचे समन्वयक अभय देशपांडे यांनी मांडली. दिव्यांच्या झगमगाटाच्या हव्यासापायी प्रकाश प्रदूषण होत असून त्यामुळे आकाशाची प्रत खाली घसरत चालली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
‘कचरा निर्मिती करता, तर विल्हेवाटही आवश्यक’!

स्वत:पासून सुरुवात करण्याचे आवाहन
कचरा हा स्रोत आहे. तो निसर्गालाच परत करायचा आहे. त्यामुळे हयातीत तीन झाडांची लागवड करा. पळवाट शोधू नका. शहरात जागा नसेल तर गावी जाऊन झाडे लावा. वसुंधराच राहिली नाही तर मानव वंश कसा जगणार?, असा सवाल करीत, कचरा निर्माण करता तर त्याच्या विल्हेवाटीचीही सुरुवात स्वत:पासूनच करा, असा सूर ‘कचरा : समस्या तशी महत्त्वाची’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आला. अवकाशातील कचऱ्याच्या भविष्यातील धोक्याबाबतही या परिसंवादात चिंता व्यक्त करण्यात आली.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

प्रत्येक घराने ठरविले तर एका दिवसात भारत स्वच्छ होईल. ओला आणि सुका कचरा हा वेगळा करून दिलाच पाहिजे. ओल्या कचऱ्यावर घरच्याघरी प्रक्रिया सुरू केली पाहिजे. तसे झाल्यास सहा महिन्यांत कचरामुक्त होऊ.
– डॉ. शरद काळे, संशोधक, बीएआरसी

सर्वाधिक कचरा निर्माण करण्यात महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात मुंबई आघाडीवर आहे. स्वच्छतेबाबत पंतप्रधानांना सांगावे लागते ही शरमेची बाब आहे. आपण चंद्रावर जायच्या गोष्टी करताना कचरा साफ करणे कठीण आहे का?
– डॉ. शाम आसोलेकर, पर्यावरण विभाग प्रमुख, आयआयटी

अवकाशातील १५ हजार उपग्रहांपैकी सध्या फक्त दीड हजार उपग्रहच कार्यरत आहेत. उर्वरित कचरा आहे. एक ते १० सेमी आकाराचे सात ते दहा लाख अवशेष अवकाशात आहेत. ते कधीतरी पृथ्वीवर आपटू शकतात. २०१५ अखेर अशा आदळण्याच्या आठवडय़ाला पाच/सहा घटना घडण्याची शक्यता आहे. अवकाशातील कचरा निवारणाचा
गहन विचार व्हायलाच हवा.
– डॉ. अभय देशपांडे,
खगोल मंडळ संस्था

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: We should increase happiness in our life

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×