वेधशाळा आणि महानगरपालिकेने सुरू केलेल्या प्रकल्पाअंतर्गत पुढील महिन्याभरात शहरातील २८ ठिकाणांच्या हवामानाची माहिती दर १५ मिनिटांनी मुंबईकरांना उपलब्ध होईल.
पावसाळ्यात एखाद्या ठिकाणी तासाभरात पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात; पण शहरातील नेमक्या कोणत्या ठिकाणी पावसाची माहिती मिळत नाही. त्यात वाहतूक कोंडी होऊन जनजीवन ठप्प होते. यावर मार्ग काढण्यासाठी न्यायालयानेही पावसाची नियमित माहिती मुंबईकरांना देण्याची सूचना केली होती. सफर प्रकल्पाअंतर्गत त्यातील दहा ठिकाणी हवेची प्रतवारी नोंदवणारी केंद्र लावण्यास सुरुवात केली. आता २८ पैकी २४ ठिकाणचे काम पूर्ण झाले असून आयआयटी- पवई, सोमय्या महाविद्यालय- विद्याविहार व मुलुंड येथे तीन केंद्र लावली जाणार आहेत. हवामान केंद्रासाठी जागा, वातानुकूलन यंत्र व वीजशुल्क यांचा खर्च पालिकेने केला आहे.
या सर्व केंद्रावर तापमान, पाऊस, वाऱ्याची दिशा व वेग तसेच हवेचा दाब अशा माहितीची नोंद सुरू आहे. महिनाभरात संकेतस्थळामार्फत मुंबईकरांपर्यंत पोहोचणार आहे, असे मुंबई वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
प्रक्रिया सुरू
दहिसर, मुलूंडपासून कुलाब्यापर्यंत प्रत्येक उपनगरात किमान एक केंद्र उभारले गेले आहे, तसेच १३ ठिकाणी एलईडी स्क्रीनद्वारे हवामानाची माहिती देण्यात येत आहे. बोरीवली, मालाड, अंधेरी, भांडुप, चेंबूर, वांद्रे, वरळी, माजगाव व कुलाबा या नऊ ठिकाणची हवेची प्रतवारी व तापमान, वाऱ्याचा वेग व दिशा आदी माहितीही सफर संकेतस्थळावर मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

थंडीच्या लाटेनंतर आता उष्ण झळा

खास प्रतिनिधी, मुंबई</strong>
नवीन वर्षांची सुरुवात आणि गुलाबी हवा यांची जोडी गेली अनेक वर्षे कायम आहे. वर्षांअखेरीला राज्यात सर्वत्रच कमाल तापमान ३० अंश से.च्या दरम्यान राहते. मात्र या वेळी थंडीच्या जोरदार लाटेनंतर अचानक उष्णता वाढली असून राज्यभरात कमाल तापमानात पाच ते सहा अंश से.ची वाढ झाली आहे. जानेवारीच्या पहिल्या तारखेला सरासरी कमाल तापमान ३५ अंश से.वर राहण्याचा वेधशाळेचा अंदाज आहे.
डिसेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात अचानक आलेल्या थंड लाटेमुळे राज्यातील बहुतांश ठिकाणचे किमान तापमान १० अंश से.खाली गेले होते. मात्र थंडीची ही लाट अल्पजीवी ठरली. त्यामुळे भर हिवाळ्यात गेले दोन दिवस देशातील सर्वच भागातील तापमान वाढले असून दिल्लीतही सरासरीपेक्षा पाच अंश से.ची वाढ झाली आहे. राज्यातही हीच स्थिती आहे. मुंबईत तापमान ३५ अंश से.वर आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weather forecast now every 15 minutes
First published on: 01-01-2016 at 00:17 IST