मुंबई : Mumbai Weather Forecast ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे राज्यात पुनरागमन झाले आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली असून पुढील चार-पाच दिवस राज्यासह मध्य भारतातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. मात्र, मुंबईत पुढील तीन दिवस पावसाच्या तुरळक सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
१५, १६ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळूहळू वाढेल. तसेच रविवार १७ ते मंगळवार, १९ सप्टेंबरच्या सुमारास कमी दाबाचे क्षेत्र मुंबईकडे सरकण्याची शक्यता असल्यामुळे त्यानंतर मुंबईत मुसळधार पाऊस होऊ शकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरावर २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.



