नैसर्गिक किंवा तांत्रिक आपत्तीच्या काळात प्रवासी आरक्षणासंबंधीची माहिती पुसली जाऊ नये यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवासी आरक्षण प्रणाली साठी ‘मेगाब्लॉक’ करण्याचे ठरवले आहे. या कामासाठी आरक्षण प्रणाली रविवार संध्याकाळी ७ पासून सोमवार पहाटे ३ पर्यंत बंद राहणार आहे.
आरक्षणाची माहिती कुठल्याही नैसर्गिक किंवा तांत्रिक आपत्तीच्या काळात सुरक्षित रहावी यासाठी मुंबईतील आरक्षणाचा सर्व डेटा सिकंदराबाद येथील मिरर सव्‍‌र्हरवर घेण्यात येणार आहे. या कामासाठी आरक्षण प्रणाली रविवार संध्याकाळी ७ पासून सोमवार पहाटे ३ पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत ऑनलाईन बुकींग, तिकीटाचा परतावा, चालू आरक्षण आणि आयव्हीआरएस बंद राहणार आहे. चौकशी क्रमांक १३९ आणि संगणीकृत आरक्षण प्रणाली बंद राहणार आहे. मात्र चालू बुकींग आणि तिकिटाचा परतावा देण्याचे काम मानवी पद्धतीने (मॅन्युअली )केले जाईल.