मुंबई : लोकलच्या पेंटोग्राफमध्ये ओव्हरहेड वायर अडकून झालेल्या तांत्रिक समस्येमुळे पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा विस्कळीत झाली. बोरिवली स्थानकात सकाळी साडेदहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे जलद मार्गावरील लोकल सेवा दोन तास विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

चर्चगेट-बोरिवली लोकल बोरिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर येत असतानाच या लोकलचा पेंटोग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. त्यामुळे लोकल जागीच थांबली. जलद मार्गावर घडलेल्या या घटनेमुळे अप व डाऊन जलद मार्गावरील लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. याची माहिती मिळताच पंधरा ते वीस मिनिटांत रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. अंधेरी येथून दुरुस्तीसाठी टॉवर वॅगनही मागविण्यात आली आणि दुरुस्तीचे काम सुरू झाले. तोपर्यंत बोरिवली स्थानकादरम्यान अप व डाऊन जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर वळविण्यात आल्या. यात अप मार्गावरील चार लोकल आणि डाऊन मार्गावरील तीन लोकल एकामागोमाग एक उभ्या होत्या.

1878 summer special trains from Western Railway and 488 from Central Railway
पश्चिम रेल्वेवरून १,८७८ आणि मध्य रेल्वेवरून ४८८ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या
Mega block on Sunday on Western Railway
मुंबई : पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
dombivli, central railway trains running late marathi news
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली

लोकल पुढे जात नसल्याने प्रवाशांनी रुळांवर उतरून जवळचे स्थानक गाठले. यात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. परिणामी, सर्वच मार्गावरील लोकल विलंबाने धावू लागल्याने कामावर जाणाऱ्यांना त्याचा फटका बसला. विलंबाने धावणाऱ्या लोकलमुळे फलाटावर आणि गाडय़ांना प्रचंड गर्दीही झाली. मेल-एक्स्प्रेस गाडय़ांवरही या घटनेचा परिणाम झाला. दरम्यान, रेल्वेने हाती घेतलेले दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास दुपारचे सव्वाबारा वाजले. त्यानंतर साडेबाराच्या सुमारास पहिली लोकल बोरिवलीच्या फलाट क्रमांक आठवरून धावली. हळूहळू अप व डाऊन जलद मार्गावरील लोकलचे वेळापत्रक सुरळीत झाले. दरम्यान, अनेक लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या, तर काही लोकल विलंबाने धावत होत्या. बोरिवली रेल्वे स्थानकातील घटनेत लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. यामध्ये अप व डाऊन मार्गावरील ४५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर मुंबई सेन्ट्रलच्या दिशेने जाणाऱ्या सहा मेल, एक्स्प्रेस गाडय़ा ३५ ते ९० मिनिटे विलंबाने धावत होत्या. तर डाऊनला जाणाऱ्या तीन मेल, एक्स्प्रेसही पाऊण ते एक तास उशिराने सुटल्या.