पश्चिम रेल्वेच्या तकीट तपासकाने(टीसी) मागील २०२२ या वर्षात विनातिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल १३ हजार जणांना पकडले, म्हणजे दिवसाला सरासरी ३६ अशी प्रकरणे नोंदवली गेली आणि याद्वारे तब्बल १ कोटीपेक्षा अधिक रुपयांचा दंड वसूल झाला.

पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, जाहिद के कुरेशी(उपमुख्य तिकीट निरीक्षक) यांनी पश्चिम रेल्वे मार्गावर वर्षभरात आतापर्यंतचा सर्वाधिक तिकीट तपासणी दंड वसूल केला आहे. त्यांनी वर्ष २०२२ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या ११ हजार ६८४ जणांकडून आणि १ हजार ४३२ अनियमित प्रवाशांकडून एक कोटींहून अधिक दंड वसूल केला.

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
Thane Police Arrests, Interstate Thief Operating, Between Assam and Mumbai, Solves 22 Cases, theft of assam, thane theft, navi mumbai theft, mumbai theft, aeroplane, marathi news, crime news, robbery news,
चोरीसाठी विमानाने मुंबईचा प्रवास, नागालँड आसाम मधील चोरट्याला अटक
A report by Michael Page India Salary Guidesuggests that an average salary increase of 20 percent is possible for senior executives in companies
उच्चाधिकाऱ्यांना चालू वर्षात २० टक्के वेतनवाढ शक्य; ‘मायकेल पेज इंडिया’चा अहवाल
Navi Mumbai Municipal Corporation, Achieves, Record Property Tax, Collection, 716 Crore , financial year, 2023-2024,
नवी मुंबईत ७१७ कोटी मालमत्ता कर जमा, गतवर्षीपेक्षा ८३.६६ कोटी जास्त करवसुलीचा दावा

“माझे वडील सुद्धा पश्चिम रेल्वेसाठी तिकीट तपासनीस म्हणून काम करत होते. ते विभागीय मुख्य तिकीट निरीक्षक(ग्रँट रोड, मुंबई विभाग) म्हणून सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी प्रामाणिकपणे व सचोटीने काम केले. त्यांना रेल्वे मंत्रालयाचे पुरस्कार आणि अनेक महाव्यवस्थापक व पीसीसीएम पुरस्कारही मिळाले, ज्यामुळे मला व माझ्या भावानां तिकीट तपासक म्हणून भारतीय रेल्वेच्या सेवेत रुजू होण्यासाठी प्रेरणा मिळाली.” असं कुरेशी यांनी सांगितलं.

याशिवाय त्यांनी सांगितलं की, आम्ही चार भावांनी १९९५ मध्ये रेल्वे भरती बोर्ड (RRB) परीक्षा दिली होती आणि त्यामध्ये उत्तीर्ण झालो. त्यापैकी तीनजण पश्चिम रेल्वेत तिकीट तपानीस म्हणून तर एक जण सहायक लगेज क्लर्क म्हणू रुजू झाला.

जाहिद हे त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीपासूनच कष्टाळू म्हणून परिचित आहेत. त्यांना अनेक डीआरएम पुरस्कार, पीसीसीएम आणि जीएम पुरस्कार मिळाले आहेत आणि पाचवेळा मुंबई मध्य विभागाचा ‘man of the month’ हा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.