विसर्जन सोहळ्यासाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष फेऱ्या

मुंबईतील गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणुका पाहण्यासाठी अगदी परदेशातूनही लोक येत असतात. मात्र मुंबईच्या दुसऱ्या टोकाला राहणाऱ्यांना हा सोहळा पाहून आपल्या घराकडे सुखरूप परतता यावे,

मुंबईतील गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणुका पाहण्यासाठी अगदी परदेशातूनही लोक येत असतात. मात्र मुंबईच्या दुसऱ्या टोकाला राहणाऱ्यांना हा सोहळा पाहून आपल्या घराकडे सुखरूप परतता यावे, यासाठी पश्चिम रेल्वेने अनंतचतुर्दशीच्या रात्री चर्चगेट-विरार या दरम्यान आठ विशेष गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला़
चर्चगेटहून विरारला जाणारी पहिली गाडी ८ आणि ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री १.१५ वाजता सुटेल. ही गाडी विरारला २.४७ वाजता पोहोचेल. दुसरी गाडी १.५५ वाजता सुटून ३.३० वाजता, तिसरी गाडी २.२५ वाजता सुटून चार वाजता आणि चौथी विशेष गाडी ३.२०ला चर्चगेटवरून निघून ४.५५ वाजता विरारला पोहोचेल. तर विरारहून मुंबईकडे निघणारी पहिली विशेष गाडी ००.१५ वाजता निघून १.४५ वाजता पोहोचेल. दुसरी गाडी ००.४५ वाजता विरारहून रवाना होणार असून २.१७ वाजता चर्चगेटला पोहोचेल. तिसरी व चौथी गाडी अनुक्रमे १.४० आणि २.५५ वाजता विरारहून निघून ३.१२ आणि ४.३० वाजता चर्चगेटला पोहोचतील. या सर्व विशेष गाडय़ा धिम्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Western railway to run special train on immersion ceremony

ताज्या बातम्या