डॉ. आंबेडकर यांच्या हस्तलिखित साहित्याच्या संवर्धनासाठी काय करता आहात? | What are you doing for the preservation of Dr Babasaheb Ambedkars manuscripts mumbai print news msr 87 | Loksatta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्तलिखित साहित्याच्या संवर्धनासाठी काय करता आहात?

उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा; समिती फेररचनेतील विलंबाबाबतही नाराजी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्तलिखित साहित्याच्या संवर्धनासाठी काय करता आहात?
उच्च न्यायालय (संग्रहीत छायाचित्र) / लोकसत्ता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्तलिखित साहित्याच्या संवर्धनासाठी काय करता आहात? असा प्रश्न विचारून उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) राज्य सरकारला त्याबाबत दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. प्रकाशनाचे काम आणि त्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची पुनर्रचना करण्यास झालेल्या विलंबाबाबतही न्यायालयाने यावेळी नाराजी व्यक्त केली.

डॉ. आंबेडकर यांच्या साहित्य छपाईचा पाच कोटींचा कागद वापराविना’, या लोकसत्ता”मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीची न्यायालयाने दखल घेतली होती. तसेच या संदर्भात जनहित याचिका दाखल करुन घेण्याचे आदेश उ्च्च न्यायालयाच्या महानिबंधकांना दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य प्रकाशनाचे काम ठप्प होणे, ही खेदजनक बाब असल्याचे मतही न्यायालयाने त्यावेळी नोंदवले होते. तसेच ॲड. स्वराज जाधव यांची याचिकाकर्त्यांचे वकील म्हणून नियुक्ती केली होती.

प्रकाशनाचे काम आणि त्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने आतापर्यंत काय केले, अशी विचारणा करून दोन्हीची सद्यस्थिती प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याचे आदेश दिले. समिती पुनर्गठीत करण्याबाबत विचार करण्याची सूचना न्यायालयाने केली होती. त्यावर समिती नव्याने गठीत केली जाईल, असे सरकारने आश्वासित केले होते.

सध्या हे साहित्य एक छोट्या खोलीत ठेवण्यात आले आहे –

न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी प्रतिज्ञापत्र तयार असल्याचे आणि अंतिम मंजुरीसाठी संबंधित विभागाकडे पाठवण्यात आल्याचे सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी न्यायालयाला सांगितले. डॉ. बाबासाहेबांच्या हस्तलिखित साहित्याचेही संवर्धन करणे गरजेचे असल्याचे जाधव यांनी न्यायालयाला सांगितले. सध्या हे साहित्य एक छोट्या खोलीत ठेवण्यात आले आहे. तेथे त्याला वाळवी लागण्याची आणि ते कायमस्वरूपी नष्ट होण्याची शक्यता असल्याकडे जाधव यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यावर हे साहित्य मोठ्या जागेत हलवण्याचे काम सुरू असल्याचा दावा कंथारिया यांनी केला.

समितीमध्ये नव्या सदस्यांची नियुक्त का करण्यात आली नाही? –

जाधव यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेची न्यायालयाने दखल घेतली. तसेच आंबेडकर यांचे हस्तलिखित साहित्य संवर्धित करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न हे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याचे आदेश दिले. या कामासाठीच समिती नियुक्त करण्यात आली होती, मग समितीमध्ये नव्या सदस्यांची नियुक्त का करण्यात आली नाही? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विजेवर धावणाऱ्या वाहनांच्या खरेदीत ताडदेव,अंधेरी आघाडीवर

संबंधित बातम्या

‘तो’ कबुतराचं मांस चिकन म्हणून हॉटेल्सला विकायचा; मुंबईमधील धक्कादायक प्रकार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई:अद्भुत विश्वचषकात आणखी किती धक्के?
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; काय सुरू काय बंद? जाणून घ्या
मुंबई: कर्नाटकने ‘अरे’ केल्यास ‘कारे’ने उत्तर..; भाजपच्या आशीष शेलार यांचा इशारा
खारमध्ये डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, पीडिता म्हणाली, “त्याने माझे…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘साथ सोबत’ पोस्टर प्रकाशित
लोकसत्ता लोकांकिकेने आत्मविश्वास दिला!
‘रौंदळ’मधील ‘मन बहरलं..’ गाणं प्रदर्शित
‘आई म्हणून असलेल्या जबाबदारीला अधिक प्राधान्य दिले’
नात्यांची उबदार वीण