१ डिसेंबर टोलच्या नियमांमध्ये मोठा बदल केला जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावरील सगळ्या टोल प्लाझांमध्ये फास्टॅगद्वारे टोलची रक्कम भरता येणार आहे. केंद्र सरकारने १ डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व वाहनांना ‘फास्टॅग’ लावणं अनिवार्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत घोषणा केली होती. दरम्यान काय आहे फास्टॅग यासंबंधीचा व्हिडिओ लोकसत्ता ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आला आहे. काय आहे फास्टॅग प्रणाली जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून-

पाहा व्हिडीओ