‘अच्छे दिन’ आणण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले मोदी सरकार आपला पहिला अर्थसंकल्प १० जुलैला लोकसभेत मांडणार आहे. आधीच महागाई, बेरोजगारी, मंदी आणि दुष्काळी स्थिती याच्या झळा सोसत असलेल्या सामान्य माणसाला या अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल का, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. मतदारांनी मोठ्या अपेक्षेने मोदी सरकार सत्तेवर आणल्यानंतर आता सर्वसामान्यांच्या अपेक्षांची पूर्ती सरकारकडून होते की नाही, हे बघावे लागेल. मोदी सरकारच्या या पहिल्या अर्थसंकल्पाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? कोणत्या विषयांना अर्थमंत्र्यांनी प्राधान्य दिले पाहिजे, असे तुम्हाला वाटते? तुमच्या अपेक्षा सविस्तरपणे खालील कमेंट बॉक्स लिहून पाठवा…