Swara Bhaskar Husband Fahad Ahmad: बॉलिवुड अभिनेत्री स्वरा भास्करमुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील कार्यकर्ते कमालीचे नाराज झाल्याचं बोललं जात आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सध्या राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये जागावाटप व उमेदवारीवाटप चालू आहे. मात्र, आपल्याला उमेदवारी न मिळाल्यामुळे हे कार्यकर्ते नाराज असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पण त्यात स्वरा भास्करचं नाव आल्यामुळे चर्चेला सुरुवात झाली आहे. पण ही चर्चा स्वरा भास्करच्या उमेदवारीची नसून तिच्या पतीला म्हणजेच फहाद अहमदला मिळालेल्या उमेदवारीमुळे सुरू झाली आहे.

अणुशक्तीनगर … चर्चेतला मतदारसंघ!

गेल्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यामुळे मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघ चर्चेत असायचा. पण आता हा मतदारसंघ इतरही उमेदवारांमुळे चर्चेत आला आहे. एकीकडे नवाब मलिक यांना महायुतीकडून या मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मतदारसंघातून नशीब आजमावण्याची शक्यता आहे. त्याचवेळी त्यांची मुलगी सना मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अणुशक्ती नगर मतदारसंघात अजूनही मलिक कुटुंबाचीच चर्चा असताना आता सना मलिक यांच्यासमोर आव्हान देण्यासाठी शरद पवारांनी मोठी चाल खेळल्याचं बोललं जात आहे.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Aditya Thackeray News
Big Fight In Worli : वरळीचा पेपर आदित्य ठाकरेंसाठी कठीण? संदीप देशपांडे आणि मिलिंद देवरांना द्यावी लागणार टक्कर
Sharad Pawar and Yugendra Pawar
Sharad Pawar : ५७ वर्षांचा राजकीय प्रवास, बारामती मतदारसंघ अन् पवार घराणं; युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची भावूक प्रतिक्रिया!
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”

सना मलिक यांना अणुशक्तीनगर या त्यांच्या वडिलांच्या हक्काच्या मतदारसंघात आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षानं अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एकीकडे सना मलिक यांना आव्हान देण्यासाठी ही मोठी खेळी मानली जात असताना दुसरीकडे पक्षातूनच या निर्णयावर नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. अणुशक्तीनगरमधील पक्षाचे इच्छुक नेते-कार्यकर्ते यावरून ‘आमच्या कुणाचीच पत्नी अभिनेत्री नसल्यामुळे आम्हाला उमेदवारीत टाळलं’, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत आहेत.

Fahad Ahmad : शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक! स्वरा भास्करचा पती निवडणुकीच्या रिंगणात, नवाब मलिकांच्या लेकीविरोधात लढणार

कोण आहेत फहाद अहमद?

गेल्याच वर्षी स्वरा भास्करनं फहाद अहमद यांच्याशी विवाह केला. तेव्हा या लग्नाच्या निमित्ताने फहाद अहमद यांची चर्चा सुरू झाली खरी. पण त्याआधीपासून फहाद अहमद हे सामाजिक जीवनात मोठ्या प्रमाणावर कार्यरत होते. फहाद अहमद हे मूळचे उत्तर प्रदेशच्या बरेलीचे असून त्यांनी अलिगढ विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतलं. नंतर त्यांनी मुंबईतील टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स अर्थात TISS या संस्थेत प्रवेश घेतला. तिथेही विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर त्यांनी आंदोलनं केली. त्यांच्या एम. फिल पदवीवरून वाद झाल्यानंतर ती स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.

२०१८ सालीच त्यांनी CAA आंदोलनात सहभाग घेतला. पुढची दोन वर्षं या मुद्द्यावर ते सातत्याने भूमिका मांडत राहिले. २०२० साली मुंबईत झालेल्या आंदोलनात त्यांची स्वरा भास्करशी भेट झाली. भेटीचं रुपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात झालं. पण सामाजिक जीवनात कार्यरत असणारे फहाद अहमद यांनी जुलै २०२२ मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला. मुंबईत राहून ते सपाचं काम करत होते. गेल्या दोन वर्षांत त्यांनी मुंबई ते महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्षपदापर्यंत मजल मारली.

Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?

निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या अवघ्या काही दिवस आधी फहाद अहमद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश केला. त्यानंतर लागलीच अणुशक्तीनगर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे त्यांचा सामना थेट सना मलिक यांच्याशी होणार आहे. समाजवादी पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीत फारसा फरक नसल्याचं म्हणत फहाद अहमद शरद पवारांच्या पक्षात व निवडणुकीच्या रिंगणात उतरले खरे. पण त्यांचं हे पक्षांतर व विचारांतर मतदारांना किती भावेल, हे मात्र २३ नोव्हेंबर रोजीच स्पष्ट होऊ शकेल.

Story img Loader