रेव्ह पार्टी आयोजक एनसीबीच्या नजरेतून कसे सुटले? नवाब मलिक यांचा सवाल

क्रुझवरील पार्टीत सुमारे १३००  लोक सहभागी झाले होते. एनसीबीने त्या सर्वाना ताब्यात घ्यायला हवे होते.

मुंबई : क्रुझवर रेव्ह पार्टी आयोजित के ली होती, असे अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) म्हणणे असेल, तर मग त्या पार्टीत सहभागी झालेल्या सर्वानाच ताब्यात का घेण्यात आले नाही, सर्वात महत्त्वाचे म्हणजे पार्टी आयोजक नजरेतून कसे सुटले, असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते  व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीला के ले आहेत .

क्रुझवरील पार्टीत सुमारे १३००  लोक सहभागी झाले होते. एनसीबीने त्या सर्वाना ताब्यात घ्यायला हवे होते. परंतु फक्त १३ जणांना लक्ष्य करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पार्टीचा आयोजक एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचा मित्र आहे, त्यामुळेच जाणूनबुजून त्याला बाजूला करण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी के ला. दरम्यान, वानखेडे यांनी न्यायालयात जाऊन मुंबई पोलिसांकडे हे प्रकरण न देता माझी सीबीआय किंवा एनआयएमार्फत चौकशी करा, अशी विनंती के ली आहे. मुंबई पोलिसांविषयी त्यांनी अविश्वास दाखवला आहे, याचा अमली पदार्थ कारवाई प्रकरणाची काहीतरी काळेबेरे आहे, असा संशय घेण्यास वाव असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Why no action against cruise drugs party organisers nawab malik ask ncb zws

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या