मुंबई : पत्नी पैसे कमावत असली तरी उदरनिर्वाहासाठी तिचा देखभाल खर्चाचा दावा नाकारता येणार नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला. कमावत्या पत्नीला देखभाल खर्च देण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या एकाची याचिका फेटाळताना न्यायालयाने हा निर्वाळा दिला. पत्नी कमावती असली तरी तिला महिना पाच हजार रुपये देखभाल खर्च देण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला एकाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र सत्र न्यायालयाचा आदेश योग्य ठरवून न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने त्याची याचिका फेटाळली.

या जोडप्याचे मे २००५ मध्ये लग्न झाले होते. त्यांना २०१२ मध्ये मुलगा झाला. त्यानंतर पत्नीने याचिकाकर्ता आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली. जुलै २०१५ मध्ये न्यायदंडाधिकाऱ्यांनी मुलाला दोन हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. पुढे या आदेशाविरोधातील पत्नीचे अपील मार्च २०२१ मध्ये सत्र न्यायालयाने योग्य ठरवले. तसेच तिला व मुलाला देखभाल खर्च म्हणून महिना पाच हजार रुपये देण्याचे आदेश याचिकाकर्त्यांला दिले.

India abortion law
गर्भधारणेनंतर ३० आठवड्यांपर्यंत गर्भपातास परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; भारतीय गर्भपात कायदा काय आहे?
Supreme Court verdict on minor abortion
तिसाव्या आठवडयात गर्भपातास परवानगी; अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Death nurse, Corona, compensation husband,
करोनाकाळात परिचारिकेचा मृत्यू, पतीला नुकसानभरपाई नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका संवेदनशील, उच्च न्यायालयाचे ताशेरे
mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

 त्याविरोधात याचिकाकर्त्यांने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच पत्नी चांदीच्या वस्तू बनवणाऱ्या दुकानात नोकरीला आहे. शिवाय महानगरदंडाधिकाऱ्यांसमोरील उलट तपासणीतही तिने दिवसाला १०० ते १५० रुपये कमावत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ती स्वत:चा सांभाळ करण्यास समर्थ असून सत्र न्यायालयाने देखभाल खर्चाचा चुकीचा आदेश दिल्याचा दावा याचिकाकर्त्यांने केला होता.

 न्यायमूर्ती जमादार यांनी मात्र याचिकाकर्त्यांला दिलासा देण्यास नकार दिला. उपजीविकेसाठी नोकरी करणारी पत्नी देखभाल खर्च मिळण्यासाठी अपात्र ठरू शकत नाही हा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले. परिस्थितीने तिला नोकरी करण्यास भाग पाडले असावे. ती दिवसाला शंभर ते दीडशे रुपये कमावत असली तरी सध्याच्या महागाईच्या काळात दरमहा सुमारे पाच हजार रुपयांचे उत्पन्न जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसे नाही, असेही मत न्यायालयाने नोंदवले.

न्यायालयाचे म्हणणे..

पतीवर पत्नीच्या पालनपोषणाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी असते. परंतु केवळ पत्नी नोकरी करते म्हणून ती तिच्या पतीकडून देखभाल खर्चासाठी पात्र ठरत नाही हे म्हणता येणर नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.