केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी आपल्याला कोऱ्या कागदांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडल्याचा आरोप क्रुझवरील अमलीपदार्थ पार्टी प्रकरणातील आणखी एक पंच साक्षीदाराने विशेष न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे.  हे प्रतिज्ञापत्र नोंदीवर घेण्याची विनंतीही त्याने न्यायालयाला केली.

सोनू म्हस्के असे या पंच साक्षीदाराचे नाव असून त्याने विशेष न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत एनसीबी अधिकाऱ्यांनी बळजबरीने चार हिंदी भाषेतील, तर काही कोऱ्या कागदांवर स्वाक्षरी करण्यास दबाव आणल्याचा आरोप केला आहे. या कामी सहकार्य केले नाही, तर खोट्या प्रकरणात गोवण्याची धमकीही आपल्याला देण्यात आल्याचा दावा म्हस्के याने केला आहे,  अचित कुमार यांच्या घरातून हस्तगत करण्यात आलेल्या अमलीपदार्थाचा म्हस्के हा पंच साक्षीदार आहे.