बसवाहकाला मारहाण करणाऱ्या महिलेस अटक

तिकीटावरुन झालेल्या भांडणात बसवाहकाला मारहाण करणाऱ्या एका १९ वर्षीय गर्भवती महिलेस पवई पोलिसांनी अटक केली आहे. सुमैय्या मोहसीन खान असे तिचे नाव आहे.

तिकीटावरुन झालेल्या भांडणात बसवाहकाला मारहाण करणाऱ्या एका १९ वर्षीय गर्भवती महिलेस पवई पोलिसांनी अटक केली आहे. सुमैय्या मोहसीन खान असे तिचे नाव आहे. गुरुवारी सकाळी पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४२१ क्रमांकाच्या बेस्ट बस मध्ये हा प्रकार घडला.
पवईच्या फिल्डरपाडा येथील पठाणवाडीत राहणाऱ्या सुमैय्याने साकीनाक्याला जाण्यासाठी सकाळी साडेदहाच्या सुमारास बस पकडली होती. परंतु तिच्याकडे सुटे पैसे नसल्याने बसवाहकाने तिला चांदिवली जंक्शन येथील तिकिट दिले. सुटे पैसे आल्यावर साकीनाक्यापर्यंतचे तिकिट देतो, असे बसवाहक प्रशांत वनवे यांनी सांगितले. मात्र, यामुळे सुमैय्याचा राग अनावर झाला आणि तिने वनवे यांच्या श्रीमुखात भडकावली. यामुळे त्यांनी बस थांबवून नियंत्रण कक्षाला कळवून पोलिसांची मदत मागविली. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३५३ अन्वये तिला अटक केल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक हेमंत कडाळकर यांनी दिली. दरम्यान, सुमैय्यानेही वनवे यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार केली. सुमैय्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. ती आठ महिन्याची गर्भवती आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Woman arrested after assaulting bus driver