मुंबई : ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या ५९ वर्षीय तारा उमेश साबळे यांनी विधानभवना जवळील उषा मेहता चौकानजिक मंगलवारी सायंकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने ब्लेडने हातावर मारून घेतले. त्या ती किरकोळ जखमी झाली. तिला तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतले. तारा कांबळे यांनी सदनिका नावावर करण्यासाठी निबंधक कार्यालयात अर्ज केला होता. पण कायदेशिरमार्गाने ते शक्य नसल्यामुळे तिला न्यायालयत खटला दाखल करण्यास सांगण्यात आले होते. यासंदर्भात त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे चौकशीत सांगितले. महिलेला पोलिसांनी जी. टी. रुग्णालयात नेले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.