scorecardresearch

शौचालयाच्या टाकीत पडून महिला ठार, खाजगी सोसायटीतील घटना

वांद्रे पूर्व परिसरातील एका सोसायटीमधील शौचालयाच्या टाकीत पडून महिलेचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला.

शौचालयाच्या टाकीत पडून महिला ठार, खाजगी सोसायटीतील घटना
(संग्रहीत छायाचित्र)

मुंबई : वांद्रे पूर्व परिसरातील एका सोसायटीमधील शौचालयाच्या टाकीत पडून महिलेचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. निपुणा शर्मा (४१) असे या महिलेचे नाव आहे. वांद्रे पूर्व येथील शास्त्री नगर परिसरातील ‘सस्टोन’ इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली. खाजगी गृहनिर्माण संस्थेची ही इमारत असून या इमारतीमधील शौचालयाच्या टाकीत मंगळवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास निपुणा पडल्या. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि निपुणा यांना शौचालयाच्या टाकीतून  बाहेर काढण्यात आले. तात्काळ  त्यांना गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 11:06 IST

संबंधित बातम्या