मुंबई : खरतर ४०० ग्रॅम वजनाच्या बाळावर उपचार हे आमच्यासाठी आव्हान होते. शहापूरच्या आदिवासी भागातून आलेल्या एका महिलेने ४०० ग्रॅम वजनाच्या बाळाला ठाणे जिल्हा रुग्णालयात जन्म दिला. मुळातच या मातेला पुरेसा पोषण आहार मिळाला नसल्याने बाळाला वाचवणे हे मोठे आव्हान होते. जवळपास दीड महिना बाळावर एसएनसीयूत (विशेष नवजात बालक काळजी कक्ष) उपचार करत होतो…आज बाळ व आई सुखरूप आपल्या घरी परत गेले असे सांगताना डॉ सुरेश वानखेडे यांच्या चेहेर्यावर एक समाधान दिसत होते… अशा कमी वजनाच्या अनेक बाळांवर ठाणे जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार होत असून कमी वजनाच्या नवजात बाळांसाठी रुग्णालयातील एसएनसीयू जीवनदायी बनले आहे.

आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील वेगवगळ्या ठिकाणाहून प्रसुतीसाठी शेकडो महिला ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल होतात. येथे प्रसुतीकक्षात असलेले खाटा आणि बाळंतपणासाठी येणार्या महिलांची संख्या यांचे प्रमाण कमालीचे व्यस्त आहे. परिणामी प्रसुतीसाठी येणार्या अनेक मातांना जमिनीवर गादीवर झोपावे लागते. प्रसुतीसाठी येणार्या मातांची संख्या लक्षात घेता डॉक्टर व परिचारिकांचे प्रमाण कमालीचे व्यस्त आहे. या सर्वांचा ताण येथील डॉक्टरांसह व्यवस्थेवर येत असून अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांकडून तणाव निर्माण केला जात असल्याचे येथेल डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Two tigress cubs die in Pench Tiger Reserve
वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू, एकाचा जीवनमरणाचा संघर्ष…
hirakani rooms , medical colleges,
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्तनपान कक्ष बांधणार, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ७० कक्ष साकारणार
Nagpur female missing
उपराजधानीतून वर्षभरात ५५९ मुली-महिला बेपत्ता, बेपत्तांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त
Baby overcomes respiratory problems after 72 hours of continuous treatment
बाळ जन्मतः रडत नाही? सलग ७२ तास अनोखे उपचार आणि ट्याहां ट्याहां सुरू…
Tokyo subsiding epidurals for pregnant women
वेदनारहित प्रसूतीसाठी ‘या’ देशात महिलांना पैसे का दिले जातायत? काय आहे एपिड्युरल?
2 year old girl die while playing due to car accident
नागपूर : दोन वर्षीय चिमुकलीने आईच्या कुशीत सोडला जीव…

हेही वाचा…पशुगणनेसाठी प्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन

यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रसूतीनंतर कमी वजनाची बाळ जन्मला आल्यावर त्यांची काळजी घेणं हे डॉक्टरांसाठी सर्वात मोठे आव्हान असते. ठाणे जिल्हा रुग्णालयातील प्रसुतीगृह तसेच एसएनसीयू अनेक खाजगी नर्सिग होमपेक्षा चांगले असून अत्यंत आधुनिक सोयीसुविधा येथे उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी सांगितले. आमच्याकडे केवळ बाळाची व आईचीच काळजी घेतली जात नाही तर बरोबर येणार्या नातावाईकांना साकाळ संध्याकाळच्या जेवणाचीही विनामूल्या व्यवस्था केली जाते,असेही डॉ पवार यांनी सांगितले.

गेल्या ११ महिन्यात एक किलो पेक्षा कमी वजनाची ३६ मुलं प्रसूतीगृहात जन्मला आल्याचे डॉ वानखेडे म्हणाले येथील एसएनसीयू कक्ष बाळांसाठी जीवनायी असून, काही अपवाद वगळता बहुतेक कमी वजनाच्या बाळांची प्रकृती सुधारून आई आणि बाळ घरी सुखरूप जात आहेत.

ठाणे सिव्हील रुग्णालयात चांगल्या उपचारांबरोबर अवघड शस्त्रक्रिया देखील यशस्वी होत असून, रुग्णालयातील प्रसूतीगृह तितकाच क्षमतेने काम करताना दिसून येतो. प्रसूतीसाठी ठाणे शहर, ग्रामीण, दुर्गम आदिवासी भाग अणि पालघर जिल्ह्यातील गर्भवती महिला प्रसूतीसाठी सिव्हील रुग्णालयात येत असतात. काही वेळा इमर्जन्सी असणाऱ्या जोखमीच्या प्रसूती साठी गर्भवती महिला रुग्णालयात दाखल होत असतात. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतीगृहात जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाची विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे यांनी दिली.

हेही वाचा…शिष्यवृत्ती संदर्भात अर्ज तात्काळ भरा

प्रसूती गृहात अत्याधुनिक साधन असून, एखाद बाळ कमी वजनाचे जन्माला आलेच तर त्याच्यासाठी एसएनसीयू (Special newborn care Unit) कक्ष या ठिकाणी ठेवला आहे. आई आणि बाळाला कोणता त्रास होणार नाही या दृष्टीने या कक्षात सर्व सोयी ठेवण्यात आल्या आहेत. एक किलो पेक्षा कमी वजनाचे बाळ व्यवस्थित होऊन घरी जात नाही तो पर्यंत रुग्णालयाच्या एसएनसीयूमधे काळजी घेतली जाते. यामध्ये डॉ. राहुल गुरव, डॉ. शैलेश गोपनपल्लिकर, डॉ. प्रकाश बोरुळकर, वरिष्ठ परिचारिका सारिका शेणेकर, शीतल जठार आदी अथक परिश्रम करतात.

एक किलो पेक्षा कमी वजनाचे बाळ जन्माला आल्यावर या बाळाची प्रतिकार शक्ती कमी असते. याबरोबर कावीळ, श्वसनत्रास, इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा बाळांचा सांभाळण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर असते. मात्र अस असले तरी,एसएनसीयू मधिल आमचे बालरोग तज्ज्ञ, वैद्यकिय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफ़ आई आणि बाळाची आपुलकीने काळजी घेत असतात. त्यामुळेच कमी वजनाची मुलं देखील सुखरूप असतात. या कक्षमध्ये एकूण २२ खाटा आहेत. व्हेटिलेटरसह सर्व अत्याधुनिक उपकरणांनी हा विभाग सुसज्ज असून अनेकदा ४० बालक येथे उपचारासाठी दाखल असतात. रोज किमान १० ते १५ बालकांवर उपचार केले जातात तर महिन्याकाठी साधारणपणे ३५० बालकांवर येथे उपचार केले जातात.

हेही वाचा…महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलाट तिकीट विक्री बंद

डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे)

प्रसूतीगृहात मे महिन्यात एक बाळ जन्माला आले. जन्मतःच त्याचे वजन अवघे ४५० ग्रॅम होत. त्यामुळे अशा बाळांची काळजी घेणे आमच्यासाठी आव्हान होते. बाळ जवळपास दिड महिनाभर एसएनसीयू कक्षात होते. बाळाची प्रकृती सुधारल्यावर घरी पाठवण्यात आले.आता सहा महिन्यात या बाळाचे वजन साडेतीन किलो झालं आहे.
डॉ. सुरेश वानखेडे ( वरिष्ठबालरोग तज्ज्ञ)

Story img Loader