मुंबई : श्रेया निमोणकर या महिलेची गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करताना तिच्या मूत्रनलिकेला कायमस्वरूपी इजा झाल्याने डोंबिवलीच्या डॉ. सीमा शानभाग आणि नवी मुंबईचे डॉ. उज्ज्वल महाजन यांना राज्य ग्राहक आयोगाने २८ लाख ५० हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे.

निमोणकर यांच्यावर एप्रिल २०११ मध्ये शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या दोन्ही मूत्रनलिकांना इजा झाली. त्यामुळे दुसरी एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून एक कृत्रिम मूत्राशय तयार करून त्यात दोन्ही मूत्रनलिका सोडण्यात आल्या. त्यामुळे आता आयुष्यभर त्यांना विचित्र परिस्थिती व कुचंबणा सहन करावी लागणार आहे. या त्रासामुळे श्रेया निमोणकर यांना त्यांची नोकरीही गमवावी लागली. त्यामुळे त्यांनी भरपाईसाठी डॉक्टरांविरुद्ध राज्य ग्राहक आयोगापुढे अर्ज केला होता.

व्यक्तिवेध : मीना चंदावरकर
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न

दोन्ही डॉक्टरांनी त्यांच्यावर केलेला हलगर्जीपणाचा आरोप नाकारला होता आणि त्या पुष्टय़र्थ तज्ज्ञ डॉक्टरांची मतेसुद्धा जोडली होती, परंतु श्रेया निमोणकरांतर्फे दोन तज्ज्ञ डॉक्टरांनी साक्ष देऊन शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा युक्तिवाद करण्यात आला. राज्य आयोगाचे डॉ. काकडे आणि  शिरसाव यांच्या खंडपीठाने   शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना वैद्यकीय हलगर्जीपणाबाबत दोषी धरून २८ लाख ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई श्रेया निमोणकर यांना एक महिन्याच्या अवधीत देण्याचा आदेश दिला आहे. श्रेया निमोणकर यांची बाजू अ‍ॅड. पूजा जोशी -देशपांडे यांनी मांडली, तर डॉक्टरांची बाजू अ‍ॅड. डॉ. गोपीनाथ शेणॉय यांनी मांडली.